शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा बोजवारा!

By admin | Updated: July 1, 2016 01:17 IST

कृषी विभागाची उदासीनता: १,७४६ ‘ऑनलाइन’ अर्ज असताना केवळ १७ कामे पूर्ण झाली आहे.

सुनील काकडे / वाशिमपावसाचा खंड व टंचाईग्रस्त परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी मागेल त्या शेतकर्‍याला शेततळे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता; मात्र या योजनेंतर्गत शेततळे तयार करण्यासाठी मिळणारे तुटपूंजे अनुदान, शेततळे मंजुरीची किचकट प्रक्रिया यांसह इतर तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.जिल्ह्यासाठी १ हजार ८९२ शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेल्या ह्यमागेल त्याला शेततळेह्ण, या योजनेसाठी ३१ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील १ हजार ७४६ शेतकर्‍यांनी शेततळे मिळण्यासाठी ह्यऑनलाइनह्ण अर्ज सादर केले होते. त्यापोटी शासनाकडून साडेपाच कोटी रुपयांचा निधीही वितरित करण्यात आला; मात्र ज्याठिकाणी शेततळे द्यायचे आहे, त्या स्थळाचे निरीक्षण करण्यासाठी कृषी विभागाचा कर्मचारी, लघू सिंचन, जलसंपदाचा कर्मचारी आणि संबंधित शेतकर्‍याने सोबत राहून स्थळनिश्‍चित करण्याची किचकट प्रक्रिया ह्यमागेल त्याला शेततळेह्ण, या योजनेच्या अंमलबजावणीत प्रमुख अडथळा ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय शेतकर्‍यांच्या दृष्टिकोणातून इतरही अनेक किचकट समस्यांमुळे ही योजना बहुतांशी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. कृषी विभागाचे दुर्लक्षित धोरण यासाठी कारणीभूत मानले जात आहे.१४३ कामांना कार्यारंभ आदेश; १७ पूर्णह्यमागेल त्याला शेततळेह्ण, या योजनेंतर्गत १ हजार ७४६ शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले. त्यापैकी १४३ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, केवळ २७ कामे सुरू करण्यात आली. त्यातही १0 कामांना अद्याप प्रारंभच झाला नसून, १७ कामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी दिली. तथापि, आता पावसाळ्याला प्रारंभ झाल्यामुळे उर्वरित कामे ठप्प झाली असून, आगामी चार महिने कुठलेही काम शक्य नसल्याची स्थिती आहे.