यावेळी वंचित बहुजन आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्यांचे नाव घेण्यात आले. तालुक्यात गाव तिथे शाखा झालीच पाहिजे हा संकल्प करण्यात आला व येणाऱ्या मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख व जिल्हा महासचिव देवरे हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन मानोरा येथे तालुका अध्यक्षपदाची घोषणा करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ पदधिकारी कार्यकर्ते यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. बैठकीचे अध्यक्ष डॉ. संजय रोठे, तुषार भगत, पी. यू. चक्रणारायण, जय चव्हाण, अरुण इंगळे, दिनेश गवई, मनोहर राठोड, दीपक खडसे, कैलास कांबळे, लक्षण मनवर, मुसविर शेख, संदीप चक्रणारायण, विजय कांबळे, संघापल वाघमारे, धम्मानंद भगत, विनोद खाडे, विवेक आडे, अशोक कटकतलवरे, रमेश पांडे, लक्ष्मण मनवर, गोपाल चव्हाण मुख्तार अहेमद, मनोज वाघमारे, गुलाब चव्हाण, अतुल इंगळे, रमेश आमटे, जनार्दन खंडारे, गौतम सिरसाठ, अशोक पांडे, लक्ष्मण वानखेडे आदी उपस्थित होते.