शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

थकबाकीदार ग्राहकांचा होणार वीजपुुरवठा खंडित !

By admin | Updated: May 24, 2017 19:42 IST

वाशिम - महावितरणच्या वाशिम मंडळातील सहा उपविभागांमध्ये ९४ हजार ६४४ ग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाख ५७ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - महावितरणच्या वाशिम मंडळातील सहा उपविभागांमध्ये ९४ हजार ६४४ ग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाख ५७ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे. तातडीने थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा लवकरच खंडित केला जाणार आहे, असा इशारा महावितरणने दिला.घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे वाशिम मंडळामध्ये असलेल्या सहा उपविभागामध्ये एकूण ९४ हजार ६४४ ग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाख ५७ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे. यामध्ये कारंजा उपविभागात १९ हजार ७४४ ग्राहकांकडे २ कोटी ८२ लाख ७३ हजार, मालेगाव उपविभागात १६ हजार ९८७ ग्राहकांकडे ३ कोटी १८ लाख ४२ हजार, मंगरूळपीर उपविभागात १४ हजार ७६७ ग्राहकांकडे १ कोटी ८२ लाख ११ हजार, मानोरा उपविभागात ९ हजार १३० ग्राहकांकडे १ कोटी २० लाख ८६ हजार, रिसोड उपविभागात १५ हजार १४४ ग्राहकांकडे१ कोटी ९० लाख ९६ हजार तर वाशिम उपविभागात १८ हजार ८७२ ग्राहकांकडे ३ कोटी ८० लाख ४६ हजार एवढी थकबाकी प्रलंबित आहे. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून त्यामुळे नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते. थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असे महावितरणने स्पष्ट केले.