शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

१५ सप्टेंबरपर्यंत भरता येणार कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 19:09 IST

वाशिम : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान मिळविण्यासाठी पात्र शेतकºयांना १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन स्वरूपातील अर्ज व घोषणापत्रे सादर करता येणार आहेत. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी पात्र शेतकºयांनी लवकरात लवकर आपले आॅनलाईन अर्ज व घोषणापत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी केले. 

ठळक मुद्देअर्जांमध्ये राहिलेल्या त्रुटी दूर करण्याची सुविधा उपलब्ध मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यांचा आढावा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान मिळविण्यासाठी पात्र शेतकºयांना १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन स्वरूपातील अर्ज व घोषणापत्रे सादर करता येणार आहेत. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी पात्र शेतकºयांनी लवकरात लवकर आपले आॅनलाईन अर्ज व घोषणापत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याची सूचना केली आहे. वाशिम जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची नि:शुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. याकरिता संबंधित पात्र शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज व घोषणापत्र १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ६०७ शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज व घोषणापत्रे प्राप्त झाली आहेत, अशी माहिती द्विवेदी यांनी दिली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या आढाव्यानुसार वाशिम जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना आॅनलाईन अर्ज भरण्याची कार्यवाही गतिमान करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले. आॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. वेबपोर्टलवरून शेतकरी स्वत: आपले आॅनलाईन अर्ज सादर करू शकतात. कर्जमाफी अथवा प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज सादर करताना यापूर्वी काही त्रुटी राहिल्या असल्यास त्यांची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर आॅनलाईन अर्ज सादर करताना शेतकºयांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक आर. एन. कटके (८६५२१३१३०१), मारोती भेंडेकर (७४४७२३६५४५), महा ई-सेवा केंद्रांचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा (९८५०३७१६७१), आपले सरकार सेवा केंद्रांचे जिल्हा व्यवस्थापक भगवंत कुलकर्णी (९०११७२३८५९) यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले.