शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

१० रुपयांचे ४० हजार ‘क्वॉइन्स’ बँकांमध्ये ‘डिपॉझिट’!

By admin | Updated: March 3, 2017 01:15 IST

नाणे बंदची अफवा : बँकांची डोकेदुखी वाढली!

सुनील काकडेवाशिम, दि.२ - जिल्ह्यात गत काही दिवसांपासून १० रुपयांचे ‘क्वॉइन्स’ बंद झाल्याची अफवा झपाट्याने पसरली. परिणामी, गत २ दिवसांमध्ये १० रुपयांचे तब्बल ४० हजार ‘क्वॉइन्स’ विविध बँकांमध्ये ‘डिपॉझिट’ झाले आहेत. मात्र, १० रुपयांच्या ‘क्वॉइन्स’ बंदबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अग्रणी बँकेकडून करण्यात आले आहे.८ नोव्हेंबर २०१६ पासून चलनातून ५०० आणि हजारच्या नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच व्यापारपेठेतील व्यावसायिकही हैराण झाले. दरम्यान, नोटाबंदीचे विदारक परिणाम आता बहुतांशी कमी झाले असताना, १० रुपयांचे ‘क्वॉइन्स’ चलनातून बाद झाल्याच्या अफवेने डोके वर काढल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठा गोंधळ उडाला आहे.ही अफवा एवढ्या गतीने पसरली, की मुख्य व्यापारपेठेतील एकही दुकानदार १० रुपयांचे नाणे स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे जवळ जमविलेली १० रुपयांची नाणी बँकांमध्ये ‘डिपॉझिट’ करण्यासाठी संबंधितांची चांगलीच धांदलघाई उडाली आहे. यामुळे मात्र राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला असून, मोठ्या संख्येत प्राप्त होणारे १० रुपयांचे ‘क्चॉइन्स’ नेमके ठेवायचे तरी कुठे, या प्रश्नाने बँकांना ग्रासले आहे.मुद्रा अवमूल्यन करणाऱ्यांविरोधात फौजदारीचे प्रावधान - विजय नगराळेचलनातून १० रुपयांचे ‘क्वॉइन्स’ बंद झालेले नाहीत. त्यामुळे कुठल्याच छोट्या अथवा मोठ्या व्यापाऱ्याला हे नाणे नाकारण्याचा अधिकार नाही. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता व्यवहार सुरू ठेवावेत, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांनी केले. सोबतच व्यवहारात नाणे नाकारून मुद्रा अवमूल्यन करणाऱ्यांविरोधात वेळप्रसंगी फौजदारी दाखल करण्याचे प्रावधान असल्याची माहितीदेखील नगराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.१२ प्रकारचे ‘क्वॉइन्स’ चलनात ग्राह्य!१० रुपयांच्या ‘क्वॉईन्स’बाबत आरबीआयने दिलेल्या स्पष्टीकरणात १२ प्रकारच्या ‘डिझाइन्स’चे नाणे चलनात ग्राह्य असल्याचे सांगितले आहे. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील बदलाचे प्रतिबिंब म्हणून वेळोवेळी नवनव्या डिझाईन्समध्ये नाणे बनविल्या जातात, असे आरबीआयने नमूद केले आहे.केवळ ‘एसबीआय’मध्येच ‘आरबीआय’ची तिजोरी!जिल्ह्यात एकंदरित १९ राष्ट्रीयीकृत बँका कार्यान्वित आहेत. मात्र, स्टेट बँक आॅफ इंडियाचा अपवाद वगळता इतर १८ बँकांमध्ये ‘आरबीआय’ची तिजोरी (चेस्ट) नाही. अशा स्थितीत अचानक बँकांमध्ये ‘डिपॉझिट’ होत असलेले लाखो रुपयांचे १० रुपयांचे ‘क्वॉइन्स’ ठेवावे कुठे, या प्रश्नाने बँका त्रस्त झाल्या आहेत.