शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

दोन लाखाची मागणी पूर्ण न झाल्याने लग्नास नकार!

By admin | Updated: July 12, 2017 20:24 IST

सहा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : गॅरेज टाकण्याकरिता दोन लाख रुपये द्या; अन्यथा लग्नास नकार, अशी भूमिका घेणाऱ्या सहा जणांविरूद्ध मंगरूळपीर पोलिसांनी विविध कलमान्वये मंगळवारी गुन्हे दाखल केले.मंगरूळपीर येथील मो.असलम मो उस्मान यांनी बहीणीच्या मुलीचा लहानपणापासून सांभाळ केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रामपीर नगर अकोला येथे धर्म संस्कृतीनुसार विवाहासाठी स्थळ शोधले. मात्र, गॅरेज टाकण्याकरिता अश्पाक उल्ला खान याने दोन लाखाची मागणी करत थेट लग्नास नकार देवुन फसवणुक केली तसेच अश्लिल भाषेत शिविगाळ केली, अशी फिर्याद मो.असलम मो.उस्मान रा.चेहल पुरा मंगरुळपीर यांनी मंगरूळपीर पोलीस स्टेशनला दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार,  अश्पाक उला खान (२५), बरकतउल्ला खान (५३),  नसीम बानो खान (४७), नगमा अंजुम खान (२२),  नुसरत अंजुम खान (३०), अमी उल्ला खान (जफर), (२३), सर्व रा. रामपीर नगर अकोला, आदींनी ९ जानेवारी २०१७ रोजी नातेवाईकासमवेत घरी येऊन बहिणीच्या मुलीसोबत अशपाक उल्ला खान याचा साखरपुरा पार पडला. पत्रिकाही छापल्या. ईदीचे दिवशी अशपाक उल्ला खान, बरकत उल्ला खान, नसीम बानो यांनी हुंडा कमी दिला असे सांगून अशपाक उल्ला याला गॅरेज टाकण्याकरिता दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यास लग्नास नकार समजण्याची भाषा वापरली. संपूर्ण परिस्थिती समजून सांगितल्यानंतरही त्यांनी काहीच ऐकले नाही, असे फिर्यादीत मो.असलम मो.उस्मान यांनी म्हटले. मो. असलम यांनी लग्नाची पूर्ण तयारी केली. मात्र, कुणीच आले नाही. वारंवार विनवणी करूनही वराकडील मंडळी आली नाही; उलट फोनवरून अश्लिल शिवीगाळ करीत लग्नास स्पष्ट शब्दात नकार दिला, असे मो. असलम यांनी फिर्यादीत नमूद केले. याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी भादंवी कलम ४०६, ४२०, १२० ब, ५०७, ३४, ४ नुसार ११ जुलै रोजी सहा जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार रमेश जायभाये यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी पठाण हे करत आहेत.