शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सोनल प्रकल्पातील गाळ काढण्याची मागणी

By admin | Updated: April 20, 2016 02:06 IST

पावसाळ्यापूर्वी प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा!

मंगरुळपीर (जि. वाशिम): मालेगाव तालुक्यात येत असलेल्या व मंगरूळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांना लाभदायक ठरणार्‍या सोनल मध्यम प्रकल्पात यंदा प्रथमच कमी जलसाठा असून, या प्रकल्पातील गाळाचा उपसा केल्यास भविष्यात सिंचनाची समस्या निकाली निघणार आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष पुरविण्याची मागणी शे तकर्‍यांमधून होत आहे. १९८३ साली प्रकल्प पूर्ण होऊन मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न पूर्ण केले. या प्रकल्पामुळे कोरडवाहू शेती करणार्‍या शे तकर्‍यांना मोठा आर्थिक आधार या प्रकल्पामुळे मिळाला. शिवाय मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर आसपासच्या विहिरी तसेच बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाल्याने सिंचनात मोठय़ा प्रमाणात वाढ दिसून आली; मात्र मागील तीन वर्षांपासून अत्यल्प प्रमाणात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे शेतकर्‍यांना रब्बीची पिके घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. प्रकल्पाला जवळपास ३३ वर्षे पूर्ण झाली; परंतु अद्याप एकदादेखील प्रकल्पातील गाळ उपसा झाला नाही. परिणामी, प्रकल्पात पाण्याचा साठा कमी प्रमाणात होत आहे. शे तकर्‍यांच्या रब्बी पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने सोनलच्या पाण्यावर होणारे सिंचन घटत चालले आहे. याच प्रकल्पावर मालेगाव तालुक्यातील ४ व मंगरुळपीर तालुक्यातील ४ अशा ८ गावांना पाणी पुरवठा करणार्‍या जीवन प्राधिकरणाच्या दोन योजना कार्यान्वित आहेत. यावर्षी प्रकल्पातील जलसाठा घटल्यामुळे योजनेच्या प्रकल्पातील हेडवर्कच्या विहिरीत दोन मोटरपंपाद्वारे पाणी भरण्याचा प्रसंग ओढवला. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन प्रकल्पातील गाळ उपसा करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.