शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाणे व पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शाह यांनी दिले संकेत
2
नालेसफाई की महापालिकेच्या तिजोरीची सफाई? पालिका अधिकारी घरी, त्यांचे मोबाइल स्पॉटवर
3
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
4
मेट्राे स्थानक २ दिवसांत सुरू करणार; ‘एमएमआरसी’च्या अश्विनी भिडे यांची माहिती
5
महामुंबईतील वाहने बीजिंग, शांघाय, टोकियोपेक्षा जास्त; पार्किंग असेल, तरच वाहन खरेदीस मुभा
6
पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO)
7
मुंबईचे मारेकरी; काळजी घ्यावी वाटत नाही हेच शहराचे मोठं दुर्दैव
8
अ‘जून’ भरपूर... पुढील जून महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक कोसळधारा
9
विद्यार्थिनीला गुन्हेगार बनवायचे आहे का? वादग्रस्त पोस्टप्रकरणी हायकोर्टाकडून जामीन
10
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
11
LSG vs RCB : दिग्वेश राठीचा हिशोब चुकला! जितेश शर्मानं असा घेतला बदला (VIDEO)
12
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
13
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
14
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
15
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
16
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
17
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
18
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
19
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
20
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज

पैशाची मागणी महागात पडणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीशी संबंधित कोणत्याही शासकीय कामासाठी कुणी पैशाची मागणी करत असेल तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीशी संबंधित कोणत्याही शासकीय कामासाठी कुणी पैशाची मागणी करत असेल तर आता थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या कक्षासमोर ठळक अक्षरात सूचना फलकही लावला आहे.

ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समितीशी संबंधित एखादे काम करून देण्याच्या नावाखाली एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून संबंधितांकडे पैशाची मागणी होऊ शकते. पैशाची मागणी पूर्ण न झाल्यास नियमात बसणारे शासकीय काम करण्यास टाळाटाळ होते. हा प्रकार टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी आपल्या कक्षासमोर एक सूचना फलक लावला आहे. ‘जिल्हा परिषद, वाशिम अंतर्गत शासकीय कामाकरिता जिल्हा परिषदेचे अधिकारी अथवा कर्मचारी स्वत: किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने पैशाची मागणी करत असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ८६९१०२१११८ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संदेश पाठवावा’, असा या सूचना फलकावरील आशय आहे. वाशिम जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत एकाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कक्षासमोर असा फलक लावलेला नाही, हे विशेष. त्यामुळे शासकीय कामाकरिता कुणी अधिकारी, कर्मचारी पैशांची मागणी करत असेल तर आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पुराव्यानिशी तक्रार नोंदवता येणार आहे.

कोट बॉक्स

नियमात बसणारे कोणतेही शासकीय काम हे विनाविलंब, पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय कामाकरिता कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांना पैसे देऊ नये. पैशाची मागणी कुणी करत असेल तर थेट व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवावा. या मेसेजची शहानिशा केल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याविरूद्ध निश्चितच कारवाई केली जाईल.

- मंगेश मोहिते,

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, वाशिम