शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी

By admin | Updated: May 24, 2017 19:42 IST

रस्त्याच्या कडा भरणीत मातीचा वापर : नगराध्यक्ष आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरामध्ये सुरु असलेल्या रस्ता कामे करतांना रस्त्याच्या कडा भरण्यासाठी मातीचा वापर केल्या जात असल्याचे वृत्त लोकमतने २४ मे रोजीच्या अंकात प्रकाशित केल्याबरोबर नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी स्वत:हून भ्रमणध्वनी करुन याप्रकरणाची माहिती जाणून घेतली. तसेच वाशिम नगरपरिषदेचे श्रेणी क चे नगर अभियंता विजय घुगरे यांनी बांधकाम विभागाकडे कामाची पाहणी करुन चौकशी अहवाल मागविणार असल्याची माहिती दिली.लोकमतच्यावतिने २२ मे पासून ह्यविकासाचे भिज घोंगडेह्ण वृत्तमालीका सुरु करण्यात आली. यामध्ये शहरात सुरु असलेली थातूर-मातूर विकास कामांवर प्रकाश टाकण्यात आला. या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्याबरोबर त्या त्या दिवशी संबधित अधिकारी यांनी भेट दिली असता निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे निष्पन्न झाल्याने सदर काम बंद करुन व झालेले काम तोडून पुन्हा दुसऱ्या करण्याच्यासूचना सुध्दा संबधित ठेकेदाराला देण्यात आल्यात. तसेच कामांवर अकुशल मजुर कामे करीत असल्याचेही लोकमतने उघडकीस आणले होते. सदर मजुरांना सुध्दा काढून टाकण्यात आले. रस्ता काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याच्या कडा भरतांना नालीबांधकामासाठी खोदण्यात आल्यानंतर निघालेल्या मातीचा वापर भरण्यासाठी करण्यात आला. याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी संपूर्ण माहिती जाणून भागाची पाहणी नगरपरिषद अधिकाऱ्यांना सोबत घेवून करणार असल्याचे सांगितले. तर नगर अभियंता विजय घुगरे यांनी सदर प्रकाराबाबत बांधकाम विभागाला आपण चौकशी अहवाल मागून निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने सदर प्रकरण चांगलेच चिघडले आहे. शहरातील विकास कामे टिकाऊ, मजबुत व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी यावेळी सांगितले.