शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी

By admin | Updated: May 25, 2017 01:44 IST

रस्त्याच्या कडा भरणीत मातीचा वापर : नगराध्यक्ष आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरामध्ये सरू असलेली रस्ता कामे करताना रस्त्याच्या कडा भरण्यासाठी मातीचा वापर केल्या जात असल्याचे वृत्त लोकमतने २४ मे रोजीच्या अंकात प्रकाशित केल्याबरोबर नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी स्वत:हून भ्रमणध्वनी करून या प्रकरणाची माहिती जाणून घेतली, तसेच वाशिम नगर परिषदेचे श्रेणी क चे नगर अभियंता विजय घुगरे यांनी बांधकाम विभागाकडे कामाची पाहणी करून चौकशी अहवाल मागविणार असल्याची माहिती दिली.लोकमतच्यावतीने २२ मे पासून ‘विकासाचे भिजत घोंगडे’ वृत्त मालिका सुरू करण्यात आली. यामध्ये शहरात सुरु असलेल्या थातूर-मातूर विकास कामांवर प्रकाश टाकण्यात आला. यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्याबरोबर त्या-त्या दिवशी संबंधित अधिकारी यांनी भेट दिली असता, निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे निष्पन्न झाल्याने सदर काम बंद करून व झालेले काम तोडून पुन्हा दुसरे करण्याच्या सूचनासुद्धा संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्यात. तसेच कामांवर अकुशल मजूर कामे करीत असल्याचेही लोकमतने उघडकीस आणले होते. सदर मजुरांनासुद्धा काढून टाकण्यात आले. रस्ता काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याच्या कडा भरताना नाली बांधकामासाठी खोदण्यात आल्यानंतर निघालेल्या मातीचा वापर भरण्यासाठी करण्यात आला. याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी संपूर्ण माहिती जाणून भागाची पाहणी नगर परिषद अधिकाऱ्यांना सोबत घेऊन करणार असल्याचे सांगितले. तर नगर अभियंता विजय घुगरे यांनी सदर प्रकाराबाबत बांधकाम विभागाला आपण चौकशी अहवाल मागून निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने सदर प्रकरण चांगलेच चिघडले आहे. शहरातील विकास कामे टिकाऊ, मजबूत व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी यावेळी सांगितले.