...............
रिडींग न घेताच वीज ग्राहकांना देयके
अनसिंग : रिडींग न घेताच वीज ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज देयके दिली जात आहेत. महावितरणकडून ग्राहकांची लूट केली जात असल्याचे आरोप होत आहेत.
...........
मानाेऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर
मानाेरा : शहरात गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, प्लास्टिक वापरणाऱ्यांविरुद्ध कड़क कारवाईची मागणी हाेत आहे.
..........
समृद्धी महामार्गामुळे रस्त्याची दुरवस्था
कारंजा .: धनज बु. ते कारंजा रस्त्यावर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाची वाहतूक होत आहे. या वाहनांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याचा त्रास अन्य वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
..........
भारनियमनाने नागरिक त्रस्त
किन्हीराजा : येथे महावितरणकडून दिवसातील १२ तासांपैकी ८ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहेच शिवाय लघु व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.