वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २0१४-१५ या वर्षात करण्यात आलेल्या तब्बल २९६ कामांवर लेखा परिक्षण अहवालाने आक्षेप नोंदविले. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्य अधिकार्यांनी बुधवारी, जवळपास १00 ते १0५ ग्रामसेवकांवर एक हजार रुपये दंड वसुलीची कारवाई केली. सहा पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी (पंचायत), सहायक लेखा अधिकारी व सहायक कार्यक्रम अधिकार्यांवरही हलगर्जीपणाचा ठपका ठेवून एक हजार रुपये दंड वसुलीची कारवाई केल्याने जिल्हा परिषद वतरुळात एकच खळबळ उडाली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता तसेच दिरंगाई झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. सनदी लेखापालांचे सन २0१४-१५ च्या लेखा परिक्षण अहवालातही २९६ कामांवर ठपका ठेवण्यात आला. यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील सर्वाधिक १२७ कामांचा समावेश आहे. त्याखालोखाल रिसोड तालुका ६४, मानोरा तालुका ४७, मालेगाव ४१, वाशिम १0 आणि कारंजा तालुक्यातील सात कामांचा समावेश आहे. या आक्षेपांचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांना प्राप्त झाल्यानंतर, ग्रामपंचायतनिहाय अनुपालन अहवाल तीन प्रतीत सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकार्यांना दिले होते. याउपरही लेखा आक्षेपाचे अनुपालन सादर झाले नाही. ग्रामपंचायतींना कॅश पेमेंट न करण्याच्या सूचना सर्व गट विकास अधिकार्यांना केल्या होत्या; मात्र या सुचनांकडे दुर्लक्ष करून ग्राम पंचायतींनी कॅश पेमेंट केल्याचे लेखा परिक्षण आक्षेपातून समोर आले.
रोहयोच्या कामात दिरंगाई; १00 ग्रामसेवकांवर कारवाई
By admin | Updated: December 24, 2015 02:47 IST