शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात बियाणे न उगवण्याच्या तक्रारीत घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

संतोष वानखडे वाशिम : गतवर्षी खरीप हंगामात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. यंदा मात्र आतापर्यंत केवळ १९ ...

संतोष वानखडे

वाशिम : गतवर्षी खरीप हंगामात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. यंदा मात्र आतापर्यंत केवळ १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या असून, यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतली आहे.

गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी हे खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले. यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन केले होते. आतापर्यंत ९८ टक्के पेरणी आटोपली असून, सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. खरीप हंगामात पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी धावपळ करावी लागली. विशेषत: महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांसाठी वेटिंगवर राहूनही अनेक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. आता सोयाबीन, तूर, कपाशी यासह खरिपातील सर्व पिके चांगलीच बहरली आहेत. गतवर्षी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. जवळपास ३२०० तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यंदा मात्र तक्रारींची संख्या लक्षणीय घटली असून, आतापर्यंत केवळ १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. त्यातही १४ शेतकऱ्यांनी तक्रारी मागे घेतल्या तर उर्वरित ५ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले.

००००

घरगुती बियाण्यांवर सर्वाधिक भर !

बियाण्यांची संभाव्य टंचाई लक्षात घेता यंदा घरगुती बियाण्यांवर भर द्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. बियाण्यांची उगवण क्षमता तपासणीबाबत मार्गदर्शन म्हणून कृषी विभागाने गावोगावी कार्यक्रम घेतले. शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा घरगुती बियाण्यांचा वापर केला.

००००००

महाबीज बियाण्याबाबत एकही तक्रार नाही !

गेल्या वर्षी महाबीजचे बियाणे उगवले नसल्यासंदर्भात तक्रारींचा पाऊस होता. यंदा महाबीज बियाणे उगवले नसल्याबाबत आतापर्यंत एकही तक्रार महाबीजकडे प्राप्त झाली नाही, असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांनी स्पष्ट केले.

००००००००

गेल्या वर्षी प्राप्त तक्रारी : ३२००

यावर्षी प्राप्त तक्रारी : १९

किती शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतली : १४

तक्रारीत तथ्य आढळून आले नाही : ५

०००००००००००००००

कोट बॉक्स

यावर्षी घरगुती बियाणे वापरासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती केली तसेच बियाणे उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिकही दिले. यावर्षी बियाणे उगवले नसल्याच्या १९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रारी मागे घेतल्या तर पाच तक्रारीत तथ्य आढळून आले नाही.

- शंकर तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम