मानोरा : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत येत असणार्या देवठाणा शेतशिवारात जनावरे चारण्यावरून तीन इसमांमध्ये वाद झाला. त्यापैकी दोघांनी फिर्यादीस दगडाने मारहाण करून जखमी केले. १२ मे रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी १३ मे रोजी सकाळी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी विठ्ठल गोविंदराव मांजरे (वय ३५ वर्षे, रा.गिरोली) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की देवठाणा शेतशिवारात जनावरे चारण्यासाठी गेलो असता, आरोपी दत्ता प्रल्हाद पवार आणि महादेव प्रल्हाद पवार (रा.देवठाणा) यांच्या गुरांच्या कळपात गुरे मिसळल्याच्या कारणावरून झालेल्या वादात आरोपींनी आपणास दगडाने नाकावर, पाठीवर, कपाळावर मारून जखमी केले. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी प्राप्त वैद्यकीय अहवालावरून नमूद दोन्हीही आरोपींविरुध्द कलम ३२४, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास बिट जमादार रमेश बोडखे व सुनील गोतरकर करीत आहेत.
देवठाणा येथे गुरे चारण्यावरून वाद!
By admin | Updated: May 14, 2017 02:16 IST