मंगरुळपीर (जि.वाशिम), दि. ३0 : शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक २ मागील गावातलावात बुडून अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना ३0 ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. शहरातील गावतलावात दुपारी अज्ञात व्यक्तीने उडी मारल्याची चर्चा श्हरात पसरताच शहरवासीयांनी गावतलावाकडे धाव घेतली असून, या तलावासभोवताल बघ्यांची मोठी गर्दी झाली होती; मात्र या तलावात बुडून कुणाचा मृत्यू झाला, याबाबत माहिती उपलब्ध नाही. मृतदेह शोधण्याकरिता पिंजर येथील गाडगे महाराज आपातकालीन पथकास पाचारण केले असून, मृतदेह शोधल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव समोर येणार आहे.
गावतलावात बुडून अज्ञात इसमाचा मृत्यू
By admin | Updated: August 31, 2016 02:12 IST