शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये आढळले मृत अर्भक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:50 IST

पुसद ते अकोला या बसमधील एका बाकावर प्लास्टिक पिशवीत पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: येथील बसस्थानकात शनिवारी दुपारच्या सुमारास एम.एच. ४० एन. ८१०२ क्रमांकाच्या पुसद ते अकोला या बसमधील एका बाकावर प्लास्टिक पिशवीत पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आले. पोटच्या गोळ्याला प्लास्टिक पिशवीत गुदमरून मारणाºया ‘त्या’ निर्दयी मातेचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.एम.एच. ४० एन. ८१०२ क्रमांकाची पुसद-अकोला ही बस सकाळी पुसदवरून अकोला गेली. परतीत अकोल्यावरून मंगरुळपीर बसस्थानकात काही वेळेसाठी थांबली असता, बसमधील प्रवासी उतरल्यानंतर वाहक जावेद खान जमीर उल्ला खान यांना बसच्या बाकावर प्लास्टिक पिशवी आढळल्याने त्यांनी तत्काळ वाहतूक निरीक्षकांना या प्रकाराची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी ‘त्या’ पिशवीची झडती घेतली असता, पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून सदर मृत अर्भक उत्तरीय तपासणीकरिता अकोला येथे पाठविले. याप्रकरणी भादंवि कलम ११८ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.