शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या संशयावरून घडले जळीत हत्याकांड!

By admin | Updated: March 12, 2017 01:56 IST

माळेगाव येथील घटनेचा पर्दाफाशय पाच आरोपींना अटक

वाशिम, दि. ११- तालुक्यातील माळेगाव शिवारात एका इसमाचा मृतदेह ९ मार्च रोजी जळालेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेचा अवघ्या दोन दिवसात तपास पूर्ण करून ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या पथकाने दूधखेडा (ता.जि.वाशिम) येथील पाच आरोपींना अटक केली आहे. सदर घटना अनैतिक संबंधाच्या संशयावरून घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दस्तापूर (ता. मंगरूळपीर) येथील राम विश्‍वनाथ केंगार (वय ५0) हा इसम दूधखेडा (ता.जि. वाशिम) येथील युवराज देवीदास जाधव यांच्या शेतामध्ये गेल्या तीन वर्षांपासून मजुरीचे काम करीत होता. मृत राम केंगार हा जाधव यांच्या शेतातील काम करून त्यांच्याच शेतामध्ये वास्तव्य करीत होता. जेवनाचा डब्बा आणण्यासाठी केंगार याचे जाधव याचे घरी येणे-जाणे सुरू असायचे. दरम्यान, केंगार याच्यावर जाधव यांना एके दिवशी संशय आला. ४ मार्च रोजी केंगार हा नेहमीप्रमाणे शेतामध्ये झोपेची तयारी करू लागला. त्यावेळी संतप्त झालेला शेतमालक युवराज जाधव याने प्रकाश देवीदास जाधव, प्रेम देवीदास जाधव व मोहन देवीदास जाधव यांचे सहकार्य घेऊन केंगार याचा गळा दाबून त्याला जीवाने मारून टाकले. त्यानंतर त्याचा मृतदेह आणण्यासाठी गावातीलच नितिन बळीराम जाधव या ऑटोचालकाची मदत घेऊन केंगार याचा मृतदेह माळेगाव शेतशिवारात शनिवार, ४ मार्च रोजी आणून टाकला. दुसर्‍या दिवशी युवराज जाधव व प्रकाश जाधव यांनी मृतदेहाची ओळख मिटविण्यासाठी त्याला जाळून टाकण्याचा कट रचला. त्यानुसार युवराज व प्रकाश यांनी पेट्रोलची कॅन घेऊन मोटारसायकलने मृतदेह टाकून दिलेले ठिकाण गाठले व मृतदेहाच्या अंगावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकला; परंतु पेट्रोल टाकत असताना युवराज जाधव हा गंभीररीत्या भाजल्या गेला तर प्रकाश जाधव हा किरकोळ जळाला होता. हे दोघे जळाल्यामुळे व त्यांच्या शेतातील मजूर केंगार गायब झाल्यामुळे या घटनेची वार्ता झपाट्याने गावात पसरली व ही वार्ता पोलिसांपर्यंंत आल्याने घटना लगेच उघडकीस आली. पोलिसांनी चार भाऊ युवराज, प्रकाश, प्रेम, मोहन व ऑटोचालक नितिन जाधव यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३0२/२0१ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास ठाणेदार अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जायभाये, जमादार संजय आमटे, जमादार सरकटे, राजेश निर्बाण, श्रीवास्तव लालमणी, नागोराव खंडके, शैलेश ठाकूर व अमोल इंगोले यांनी केला.