शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

घंटागाडी कामगारांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: March 3, 2017 00:53 IST

मंगरुळपीरमधील वास्तव: पाच महिन्यांपासून मानधन थकीत

मंगरुळपीर, दि.२ : शहरभरातील कचरा गोळा करून स्वच्छता अभियानासाठी मोठा हातभार लावणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. मंगरुळपीर नगर पालिकेंतर्गत कार्यरत घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही. त्यामुळे स्थानिक पालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार आपल्या जबाबदारीबाबत किती गंभीर आहेत, त्याची प्रचिती येत आहे. मंगरुळपीर शहरातील १७ प्रभागांतील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक नगर पालिकेच्यावतीने घंटागाडीचे कंत्राट एका संस्थेला दिले आहे. या संस्थेमार्फत १७ कामगारांची नियुक्ती करून गेल्या वर्ष दोन वर्षांपासून शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम करण्यात येत आहे. घंटागाडी कामगार गाडीवरची घंटी वाजवर या गल्लीतुन त्या गल्लीत फिरत कचरा गोळा करतात. शहरभरातील गोळा झालेला हा कचरा शहराबाहेर तयार करण्यात आलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर टाकून शहराची स्वच्छता राखण्यात ते मोलाची भूमिका वठवितात. या कामासाठी त्यांना जेमतेम शंभर रुपये रोजप्रमाणे मासिक तीन हजार रुपये वेतन देण्यात येते. आता मागील पाच महिन्यांपासून या कामगारांचे वेतन थकले आहे. यामुळे त्यांना कुटुंबियांसह दिवाळीचा आनंद घेता आला नाहीच शिवाय त्या दरम्यान आणि त्यानंतर साजरे झालेले सणवारही साजरे करता आले नाहीत. घंटागाडी घरोघर, गल्लोगल्ली फिरवून केलेल्या कामाचा मोबदलाच मिळत नसेल, तर काम करून फायदाच काय, असा प्रश्न घंटागाडी कामगारांनी उपस्थित केला आहे. एकिकडे शासन संपूर्ण स्वक्ष्च्छता अभियान यशस्वी करण्यासाठी विविध प्रयत्न करीत असताना त्याच अभियानाचा घटक असलेल्या घंटागाडी कामगारांवर उपासमाळीचही पाळी यावी ही एक मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. खमंगरुळपीर पालिकेचा प्रभार आपल्याकडे असला तरी, देयकांबाबत आपल्याला माहिती नाही. या ठिकाणी नियमित मुख्याधिकारी वाहूरवाघ रुजू झाल्यानंतर ते घंटागाडी कर्मचाऱ्यांची समस्या तात्काळ सोडवतील. दरम्यान, यासाठी आपणही प्रयत्न करीत आहोत.-प्रमोद वानखडे, मुख्याधिकारी मंगरुळपीर घंटागाडी कामगारांना कामाचा मोबदला मिळावा म्हणून १५ दिवसांपूर्वीच पालिकेकडे देयके तयार करून सादर केली आहेत; परंतु त्याला मंजुरी मिळाली नाही. त्याची पूर्तता होताच सर्वच कामगारांचे वेतन तात्काळ चुकविण्यात येईल. कोणत्याही कामगाराचे वेतन अकारण थकविले नाही.-गौतम श्रृंगारे, घंटागाडी कं त्राटदार मंगरुळपीर