जिल्ह्यात १ जानेवारी २०२० रोजी कोरोना बाधित रुग्णांचा एकूण आकडा ६ हजार ६७२ होता. १ फेब्रुवारी रोजी तो ४८२ ने वाढून ७ हजार १५४ झाला; मात्र १ मार्च रोजी हा आकडा तब्बल १९१६ ने वाढून ९ हजार ७० झाला आहे. तथापि, १४ फेब्रुवारीपासून आढळणाºया कोरोना बाधितांचा आकडा शंभरापेक्षा अधिकच आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून या संकटावर नियंत्रण मिळविण्याकरिता सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाभरात कलम १४४ लागू असून सर्व प्रकारची दुकाने सकाळी ९ ते ५ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी; तर आठवड्यातील शनिवारच्या सायंकाळी ५ वाजतापासून सोमवारच्या सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आल्याने कोरोना संकटाचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.
.................
अशी वाढत गेली बाधितांची संख्या
१ नोव्हेंबर २०२० - ५७११
१ डिसेंबर २०२० - ६१८४
१ जानेवारी २०२१ - ६६७२
१ फेब्रुवारी २०२१ - ७१५४
१ मार्च २०२१ - ९०७०
................
बॉक्स :
‘नो मास्क’ची अंमलबजावणी; पाच लाखांचा दंड वसूल
कोरोना विषाणू संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तोंडाला नेहमी मास्क वापरणे आवश्यक ठरत आहे. प्रशासनाने या नियमाची चोख अंमलबजावणी सुरू केली आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या माध्यमातून गेल्या काही दिवसांत पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.