शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

जिल्ह्यात दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात एका दिवशी जास्तीत जास्त ७ मे. टन ऑक्सिजनची गरज भासली होती. संभाव्य तिसऱ्या ...

वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात एका दिवशी जास्तीत जास्त ७ मे. टन ऑक्सिजनची गरज भासली होती. संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून जिल्ह्यात दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केले आहे.

देशात साधारणत: मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्या लाटेत जिल्ह्याला अकोला, जालना, अमरावती आदी ठिकाणावरून ऑक्सिजनचा पुरवठा झाला. जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट नसल्याने ऑक्सिजनबाबत इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने, यासंदर्भात ‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करीत शासन, प्रशासनाचे लक्ष वेधून घेत पाठपुरावा सुरू ठेवला. दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्याच्या अखेरीस जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात ऑक्सिजन निर्मिती प्लांट कार्यान्वित झाला. दुसऱ्या लाटेत खासगी कोविड रुग्णालयांत अनेक रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वेटिंगवर राहावे लागले. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे तिपटीने आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना शासनस्तरावरून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांटवर भर देण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात एका दिवशी जास्तीत जास्त ७ मे. टन ऑक्सिजनची गरज भासली होती. या अनुषंगाने तिसऱ्या लाटेत दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात ऑक्सिजननिर्मितीचे तीन प्लांट साकारले असून, कारंजा येथील एक प्लांट पूर्णत्वाकडे येत आहे. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एक प्लांट साकारला जाणार आहे.

---------------------कोट

संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध होईल, याचे नियोजन करण्यात आले. सरकारी रुग्णालयांतील ऑक्सिजन बेडची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनीदेखील आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

- शण्मुगराजन एस.

जिल्हाधिकारी, वाशिम

--------------------

दुसऱ्या लाटेत एका दिवशी जास्तीत जास्त ७ मे. टन ऑक्सिजनची गरज भासली होती. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात तीन ऑक्सिजननिर्मिती प्लांट साकारले आहेत. याशिवाय कारंजा येथे एक आणि जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एक असे एकूण दोन प्लांट साकारले जाणार आहेत.

- मधुकर राठोड

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

----------------------पहिल्या व दुसऱ्या लाटेत खासगी कोविड रुग्णालयांना अकोला, अमरावती येथून ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला. आता जिल्ह्यात दोन खासगी ऑक्सिजननिर्मिती प्लांट साकारले जात आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांनादेखील जिल्ह्यातच ऑक्सिजन उपलब्ध होईल.

- डॉ. सचिन पवार

हृदयरोग तज्ज्ञ, वाशिम