शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरचा स्फोट, १६ वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू!

By admin | Updated: May 10, 2017 07:10 IST

मानवतकर कुटूंबियांवर काळाचा घाला : घरात लग्नाच्या साखरपुड्याची धामधूम सुरू असताना घडली ह्रदयद्रावक घटना

वाशिम :  घरामध्ये लग्नापूर्वीच्या साखरपुड्याची जय्यत तयारी झालेली असताना कार्यक्रमाच्या पहाटेच स्वयंपाक घरातील सिलींडरचा स्फोट झाला. या भीषण घटनेत एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला; तर घरातील अन्य दोनजण जखमी झाले. ही घटना वाशिम ते रिसोड मार्गावर असलेल्या दत्त नगर येथे मंगळवार, ९ मे रोजी सकाळी ७:३० वाजता घडली. मध्यप्रदेश येथे वास्तव्यास असलेले मानवतकर यांच्या कुटूंबामध्ये राधा अशोक मानवतकर या मुलीचा विवाह लोणार तालुक्यातील दाभा येथील तरूणाशी जुळला. त्यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम ९ मे रोजी वाशिम येथे मानवतकर यांचे मुळ गाव असलेल्या जांभरूण नावजी परिसरात होता. या कार्यक्रमानिमित्त वधु-वर यांचेसाठी लागणारे दागिने, कपडे, येणाऱ्या वऱ्हाडासाठी जेवनाची व्यवस्था असे सर्व साहित्य घरामध्ये चार-पाच दिवसांपूर्वीच आणून ठेवले होते. राधा मानवतकर हिच्या साखरपुड्याच्या आदल्या दिवशी १५ ते २० पाहुणे आलेले होते. त्यात ईटारसी येथील राधा हिची चुलत बहिन माला रमेश मानवतकर (वय १६) हिचा समावेश होता. मंगळवारला सकाळी सर्व पाहुणे मंडळीसाठी चहा ठेवण्याच्या निमित्ताने गॅस पेटवत असताना अचानक गॅसने भडका घेतला. या भडक्याने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. हा स्फोट एवढा भीषण होता की सिलींडरच्या टाकीचे तुकडे सुमारे २०० ते ३०० मिटरपर्यंत दुर फेकल्या गेले. एवढेच नव्हे तर टिनाचे घर असल्यामुळे संपुर्ण टिनाचा अक्षरश: चुराडा झाला. सिलेंडरचा भडका उडाल्यानंतर घरातील सर्व मंडळी घराबाहेर पडली. परंतू, घरामध्ये पलंगावर माला रमेश मानवतकर ही गाढ झोपेत असल्याचे कुणाच्याही ध्यानीमनी आले नाही. माला हिला आगीचे चटके जानवल्यानंतर तिने जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली, परंतू आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे तिला कुणीच वाचवू शकले नाही. या आगीमध्ये माला हिच्या शरिराचा अक्षरश: कोळसा झाला. घरातील नवरी-नवरदेवाचे कपडे, दागिने, स्वयंपाकासाठी आणलेले धान्य असे अंदाजे ३ ते ४ लाख रूपयाचे साहित्यही या आगीमध्ये भस्मसात झाल्याची माहिती आहे.