शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

सायकलींगमध्ये तीन विद्यार्थीनी विभागीय स्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 13:47 IST

वाशीम : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे विद्यमाने, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशीम व्दारा स्थानिक जिल्हा क्रीडा मैदानात झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलींग क्रीडा स्पर्धेत स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या तीन विद्यार्थीनींनी चमकदार कामगिरी करुन विभागीय स्तरावर झेप घेतली.    यामध्ये १४ वर्ष वयोगटात ...

ठळक मुद्देराणी लक्ष्मीबाई कन्या शाळा विद्यार्थांचा सत्कार

वाशीम : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे विद्यमाने, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशीम व्दारा स्थानिक जिल्हा क्रीडा मैदानात झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलींग क्रीडा स्पर्धेत स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या तीन विद्यार्थीनींनी चमकदार कामगिरी करुन विभागीय स्तरावर झेप घेतली.

    यामध्ये १४ वर्ष वयोगटात  कोमल दिपक जितकर  हिने ७ किमी. सायकलींग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर १७ वर्ष वयोगटात निकिता गजानन मापारी  हिने प्रथम क्रमांक व  प्रतिक्षा अनिल देशमुख  हिने व्दितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. या तीन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्या विभागीय स्तरावर खेळविल्या जाणार्‍या सायकलींग स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक विष्णू इढोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

    विद्यार्थीनींनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल वाशीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मधुकरराव अनसिंगकर, उपाध्यक्ष दत्तात्रय देशमुख, सचिव डॉ. प्रदीप फाटक, सहसचिव डॉ. सुनिता घुडे, सदस्य धनंजय खरे, विजयाताई देशपांडे, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी, उपमुख्याध्यापक सुरेश खरावन, पर्यवेक्षिका शिला वजीरे, क्रीडा शिक्षक विष्णू इढोळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी या तीन्ही खेळाडूंचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.