शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘रानमळा’कडे शेतक-यांसह ग्राहकांनी फिरवली पाठ

By admin | Updated: May 4, 2015 01:31 IST

‘आत्मा’चे नियोजन हुकले

नंदकिशोर नारे /वाशिम : शेतकरीहिताच्या पोकळ गप्पा ठोकणारा जिल्हय़ाचा कृषी विभाग आणि आत्मा प्रकल्पांतर्गत दि. १ मेपासून जिल्हा क्रीडांगणावर सुरू झालेल्या रानमळा महोत्सवात उत्पादक शेतकर्‍यांनी नगण्य सहभाग दर्शविला असून, गहू, टरबूज यासह इतर १ ते २ उत्पादनांवरच अधिक भर दिल्या गेल्याने ग्राहकांनी या महोत्सवात खरेदीला अल्प प्रतिसाद दिला आहे. दि. २ मे रोजी दुपारच्या सुमारास महोत्सवस्थळी शुकशुकाट दिसून आला. कृषी विभाग आणि ह्यआत्माह्णने नियोजनात केलेला कामचलावूपणा यामुळे उघड झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्माच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रानमळाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हा क्रीडा संकुल येथे १ मे रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते ह्यरानमळा २0१५ह्णचे उद्घाटन झाले. याअंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी पिकविलेला शेतमाल, धान्य, डाळी, कडधान्य, फळे, भाजीपाला व इ तर उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे; मात्र या महोत्सवाला भेट देऊन पाहणी केली असता, पेन्डॉलमध्ये गहू, टरबूज, खरबूज, कांदे, बटाटे, टमाटर, आंबे, काही प्रमाणात डाळिंब या शेतकर्‍यांच्या उत् पादनांचे स्टॉल दिसून आले. कृषी विभाग आणि आत्माने आपला भोंगळ कारभार लपविण्यासाठी या महोत्सवात स्टॉलची संख्या वाढविण्यासाठी महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांचा आधार घेतला आहे. यामुळेच शे तमाल, धान्य, डाळी, कडधान्य, फळे, भाजीपाला या स्टॉलच्या तुलनेत लोणचे, पापड, खारोडी, कॉस्मेटिक क्रिम, पाणीपुरी आदी प्रकार ज्यांचा शेतकर्‍यांशी कुठलाही संबंध येत नाही, त्या स्टॉलचा महोत्सवात अधिक भरणा केल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकर्‍यांसोबतच लोकप्रतिनिधी, ग्राहकांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार कृषी विभाग आणि आत्माने अवलंबून शासनाकडून मिळालेल्या निधीचाही अपव्यय केल्याची चर्चा होत आहे. यंदाच्या महोत्सवात जिल्ह्या तील सहाही तालुक्यातून प्रत्येकी पाच शेतकर्‍यांनी आपल्या कृषीमालांची दालने उभारल्याचे सांगून कृषी विभाग व आ त्माने महोत्सवात विक्रीसाठी गहू, डाळी, गूळ, काकडी, कलिंगड, डाळिंब, केळी, भुईमूग शेंग यासह विविध कृषी उत् पादनांचा समावेश केल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात मात्र गूळ, काकडी, कलिंगड, केळी, भूईमुग शेंग आदी प्रकार या महोत्सवात दिसला नाही.