लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील पिके आता सुकू लागली आहेत. खरिपाच्य ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस आणखी लांबला तर दुबार पेरणी करावी लागणार आहे.तालुक्यात यावर्षी आजवर ६२ हजार १६३ हेक्टर वर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये सोयाबीन ४७ हजार ९४९ हेक्टरवर, ज्वारी ३४३ हेक्टरवर, मक्का ५६ हेक्टरवर, इतर तृण धान्य ११ हेक्टरवर, तूर ९ हजार ६५७ हेक्टरवर, मूग ११५८ हेक्टरवर, उडीद २१३४ हेक्टरवर, तर तीळ ८ हेक्टरवर, तसेच कपाशी ३०७ हेक्टर जमिनीवर पेरण्यात आली आहे. तथापि, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके सुकत असून, हीच स्थिती राहिली, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.
मालेगाव तालुक्यातील पिके संकटात
By admin | Updated: July 8, 2017 01:33 IST