शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पीक पाहणी खोळंबली!

By admin | Updated: July 14, 2017 01:49 IST

शेतकरी चिंताग्रस्त: कृषी सहायकांच्या आंदोलनामुळे अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदा पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पिके संकटात असून, शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्हा स्तरावर कृषी विभागाने ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी पीक पाहणी करण्याचेही ठरवले; परंतु शासनाच्या इतर योजनांची अंमलबजावणी सुरू असतानाच कृषी सहायकांच्या काम बंद आंदोलनामुळे पीक पाहणीच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात यंदा सुरुवातीला जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामच संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात जूनच्या पूर्वाधातच ५० टक्क्यांहून अधिक पेरणी आटोपली, तर सद्यस्थितीत एकूण प्रस्तावित असलेल्या ४ लाख १३ हजार हेक्टरपैकी ३ लाख ५० हजारांहून अधिक क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.तथापि, पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढवले आहे. प्रामुख्याने कारंजा, मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यातील पीकपरिस्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे. जिल्हा कृषी विभागाच्यावतीने याबाबत आढावा घेण्यासाठी पीक पाहणी कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. कोठे दुबार पेरणीचे संकट आहे, कोण्या भागात पिकाची परिस्थिती गंभीर आहे, याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि नुकसान टाळणे हा कृषी विभागाचा उद्देश होता. त्याबाबत तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. तथापि, कृषी विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ असल्याने आधीच अनेक अडचणी असताना आता त्यात कृषी विभागाच्या आंदोलनाचीही भर पडली आहे. राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. यामुळे कृषी सहायकांवर मोठा अन्याय होणार आहे. तो होऊ नये यासाठी जिल्ह्यातील कृषी सहायकांनी मागील दीड महिन्यांपासून विविध टप्प्यांत आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कृषी सहायकांना नाइलाजास्तव काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता मागील तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू असल्याने कृषी विभागाच्या विविध कामांवर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण आणि पीक परिस्थितीची माहिती घेतली असता कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात पावसाअभावी जवळपास ३० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे कळले. कृषी विभागाकडून याबाबत अधिक आणि अचूक माहिती घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत; परंतु आवश्यक मनुष्यबळाअभावी त्यांना निश्चित आकडेवारी मिळणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या माहितीनुसार आम्ही प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरविले आहे; परंतु अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पीक परिस्थितीचा अंदाज घेण्यासह इतर योजनांची अंमलबजावणी कठीण झाली आहे. -दत्तात्रय गावसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.