शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 3, 2016 02:25 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका; पंचनाम्यात दिरंगाई.

वाशिम: वादळवारा व विजांच्या कडकडाटात जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळनंतर जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेकडो हेक्टरवरील भाजीपाला, फळबाग व रब्बी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्हय़ातील १0९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे.२७ फेब्रुवारी रोजी सकाळपासून जिल्हय़ात ढगाळ वातावरण होते, तसेच वातावरणात दमटपणाही वाढला होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील वाशिम, मानोरा, मंगरूळपीर, कारंजा, मालेगाव, रिसोड या सहाही तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. जिल्हय़ातील मालेगाव, रिसोड, मानोरा व कारंजा तालुक्यामध्ये २७, २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी वार्‍यासह पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल संबंधित तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालानुसार रिसोड तालुक्यातील १८६ हेक्टर, मालेगाव ७0, कारंजा ७६0 व मानोरा तालुक्यातील ७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. १ मार्च रोजी सायंकाळनंतर रिसोड, मंगरुळपीर, वाशिम, कारंजा तालुका व अन्यत्र वादळवार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे भाजीपाला, फळबाग व रब्बी हंगामातील गहू, हरभर्‍याचे नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे व सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. काही ठिकाणी दिरंगाई होत असल्याने पीक नुकसानापासून शेतकर्‍यांना वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानोरा तालुक्यातील २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या पाऊस, वादळीवार्‍यासह गारपिटीमुळे ७ गावातील ७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याबाबत तहसीलदार मानोरा यांनी प्राथमिक अहवालानुसार कळविले आहे. गत तीन वर्षांपासून वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर नैसर्गिक संकट कोसळत आहे. पावसाळ्यात फितूर होणे आणि जानेवारी ते मार्च दरम्यान येणार्‍या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.