शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST

वाशिम : काेराेना संसर्ग कमी हाेत असला तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेचा बालकांना त्रास ...

वाशिम : काेराेना संसर्ग कमी हाेत असला तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेचा बालकांना त्रास जाणवणार असल्याने बालकांना ताप आल्याबराेबर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा व मुलांच्या अंगावर ताप काढण्याचे टाळावे, असे आवाहन बालराेग तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यात काेराेना संसर्ग कमी हाेत असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. पालकांनीही जागरूक राहून आपल्या बालकांकडे विशेष लक्ष पुरविण्याचे आवाहन आराेग्य विभागाकडून केले जात आहे. गरज पडल्यास डाॅक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

---------

सर्दी, खोकला, तापाची साथ

लहान बालकांमध्ये सद्य:स्थितीत तापाची साथ असून, अनेक बालके आजारी पडत आहेत. सर्दी, खाेकल्यासाेबतच ताप येत असल्याने दवाखान्यांत माेठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. बाल रुग्णालये हाऊसफुल्ल दिसून येत आहेत.

-------

ताप आला म्हणजे कोरोना असे नाही, पण...

पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्दी-पडसे हाेणे साहजिक आहे. परंतु अंगात ताप असेल तर ताे काेराेनाच आहे असे नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्याने औषध घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत लहान बालकांना पाेटाचे आजारही जडत आहेत. याला घाबरून न जाता औषधाेपचार करावा, असा सल्ला बालराेगतज्ज्ञ देत आहेत.

ताप आल्यास घाबरून न जाता डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

---------

प्रशासनाचे नियाेजन

काेराेनाची तिसरी लाट बालकांसाठी घातक ठरू शकते. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पूर्णपणे नियाेजन करण्यात आले आहे. बालकांसाठी काेविड केअर सेंटरच्या तयारीसह पूर्णपणे नियाेजन आराेग्य विभागाने केलेले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सभा घेऊन संबंधितांना मार्गदशर्क सूचनासुद्धा केल्या हाेत्या.

-------

घाबरू नका, काळजी घ्या!

लहान मुलांना ताप आल्यास ताप अंगावर न काढता ताबडताेब दवाखान्यात नेऊन डाॅक्टरांचा सल्ला घ्या. घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे.

- डाॅ. विजय कानडे, बालराेगतज्ज्ञ, वाशिम