शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत आधार केंद्रांवर दाखल होणार फौजदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:03 IST

वाशिम : शासनाकडून राज्यभरात पुरविण्यात आलेल्या ३ हजार ९२९ आधार नोंदणी  कीट आता महा-ऑनलाईनच्या माध्यमातून यापुढे केवळ महसूल मंडळांतर्गत आणि शहरी भागातील प्रशासकीय कार्यालयांमध्ये कार्यान्वित होणार आहे. अनधिकृत चालविल्या जाणार्‍या आधार नोंदणी केंद्रांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती सूत्रांनी बुधवार, २७ सप्टेंबरला दिली. 

ठळक मुद्देशासनाचे निर्देश प्रशासकीय कार्यालयांमध्येच राहील अधिकृत केंद्र

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाकडून राज्यभरात पुरविण्यात आलेल्या ३ हजार ९२९ आधार नोंदणी  कीट आता महा-ऑनलाईनच्या माध्यमातून यापुढे केवळ महसूल मंडळांतर्गत आणि शहरी भागातील प्रशासकीय कार्यालयांमध्ये कार्यान्वित होणार आहे. अनधिकृत चालविल्या जाणार्‍या आधार नोंदणी केंद्रांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती सूत्रांनी बुधवार, २७ सप्टेंबरला दिली. राज्यशासनाने २६ जानेवारी २0१७ पासून अनुदानविषयक सर्व योजना ‘ऑनलाईन’ केल्या असून योजनांतर्गत कामांकरिता आधार क्रमांक अनिवार्य केला आहे. असे असताना आजही अनेकांकडे आधार कार्ड नाहीत. बाळ जन्माला येताच त्याच्या आधार क्रमांकाची नोंद घेण्याची देखील सुविधा उपलब्ध नव्हती. ही बाब लक्षात घेवून शासनाने १६ सप्टेंबर २0१७ रोजी महत्वपूर्ण अध्यादेश पारित करून प्रशासकीय यंत्रणांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत. त्यानुसार, यापुढे जिल्हानिहाय महसूली मंडळातील गावे, शहरी भागातील प्रशासकीय कार्यालयांमध्ये आधार नोंदणीची सोय उभी होणार आहे. आधार नोंदणीसाठी महा-ऑनलाईन या संस्थेकडेच जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  पश्‍चिम वर्‍हाडात २१६ अधिकृत केंद्र राहणार आहेत. वाशिम ५३, अकोला ५८ आणि बुलडाणा जिल्ह्यातील १0५, अशा २१६ केंद्रांना आधार नोंदणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. 

आधार नोंदणीसाठी केवळ ‘महा-ऑनलाईन’च मुख्य ‘एनरॉलमेंट एजन्सी’ म्हणून कार्यरत राहणार आहे. त्यानुसार, जिल्हांतर्गत अंमलबजावणी सुरू झाली आहे.- सागर भुतडाजिल्हा समन्वयक, ‘महा-ऑनलाईन’, वाशिम