शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा ग्रामपंचायतच्या तत्कालीन सचिवावर दाखल होणार गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:12 IST

राजूरा : येथील ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच व सचिवांनी ग्रामपंचायत कामकाजात गैरप्रकार व अनियमिता केल्याची तक्रार मनीष दत्तराव मोहळे यांनी केली होती. मात्र, गत दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने मोहळे यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान, त्याची दखल घेत तत्कालीन ग्रामसचिव ए.बी. मुंढे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी १४ ऑगस्ट रोजी पोलीस प्रशासनाकडे पत्र सादर केले आहे. 

ठळक मुद्दे ठाणेदारांना पत्र गटविकास अधिकार्‍यांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क राजूरा : येथील ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच व सचिवांनी ग्रामपंचायत कामकाजात गैरप्रकार व अनियमिता केल्याची तक्रार मनीष दत्तराव मोहळे यांनी केली होती. मात्र, गत दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने मोहळे यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान, त्याची दखल घेत तत्कालीन ग्रामसचिव ए.बी. मुंढे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी १४ ऑगस्ट रोजी पोलीस प्रशासनाकडे पत्र सादर केले आहे. राजुरा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व सचिवाने विकासकामांत गैरप्रकार  केल्याचा आरोप करताना सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी मनीष मोहळे यांनी ६ एप्रिल २0१५ रोजी संबंधितांकडे केली होती. मात्र, दोन वर्षांतही या प्रकरणाची दखल न घेतल्याने स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा मोहळे यांनी दिला होता. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी मालेगावच्या गटविकास अधिकार्‍यांना पत्र पाठवून या प्रकरणी तत्काळ चौकशी करण्याचा आदेश दिला होता. तसेच मोहळे यांनाही पत्र पाठवून यासंदर्भात गटविकास अधिकार्‍यांना कार्यवाही करण्याचा आदेश दिल्यामुळे आत्मदहनाचा इशारा मागे घेण्याची सूचना केली होती. उप मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आदेशानंतर मालेगावच्या गटविकास अधिकार्‍यांनी विस्तार अधिकार्‍यांमार्फत चौकशी करून सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे तत्कालीन सचिव मुंढे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सूचना काढण्यात आली.