................
मोबाईल युनिटचा गाव भेट कार्यक्रम
धनज : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, रिसोडद्वारा संचलित फिरते वैद्यकीय पथक जिल्ह्यातील ४८ गावांमध्ये कार्यरत आहे. या पथकाद्वारे गरोदर महिला, स्तनदा माता, बालक व इतर रुग्णांची मोफत तपासणी करून औषध वितरित करण्यात येत आहे.
..................
चोरीचा तपास थंडबस्त्यात
कामरगाव : कामरगाव पोलीस चौकी अंतर्गत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी पोलिसांत संबंधितांनी तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्हेही दाखल करण्यात आले; परंतु या प्रकरणाचा तपास अद्यापही पूर्ण होऊ शकला नाही.
..................
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
पोहरादेवी : यवतमाळ जिल्ह्यातून येणारे वाहनचालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा प्रकार मानोरा पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी गत आठवड्यापासून पोहरादेवी परिसरातील मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली आहे. यात १५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
...................
हातपंप बंद; ग्रामस्थांची गैरसाेय
इंझाेरी : उंबर्डा बाजार येथील बसस्थानक परिसरातील हातपंप गेल्या काही दिवसांपासून बंद पडल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. बसस्थानक परिसरातील हातपंपाची गेल्या काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने दुरुस्ती केली होती; मात्र काही दिवसांतच पुन्हा बिघाड होऊन हा हातपंप बंद पडला.
..................
गरोदर माता तपासणी शिबिर
पोहरादेवी : वाईगौळ येथे गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये स्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्याम जाधव आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश जाधव यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेतेे.
.................
हरणांकडून हरभरा पीक उद्ध्वस्त
कोठारी : परिसरात शिवारात गेल्या आठवडाभरापासून उगवलेल्या रबी पिकांवर हरीण, माकडे, नीलगाईचे कळप ताव मारून नुकसान करीत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. सोमवारी परिसरात हरणांच्या कळपांनी हरभरा पिकाचे अतोनात नुकसान केले.
................
१८ गावांत अनियमित वीजपुरवठा
धनज बु.: धनज बु.सह परिसरातील १८ गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.