शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

लग्नसराईत बसतोय कॅशलेसचा दोन टक्क्यांचा फटका

By admin | Updated: May 29, 2017 01:36 IST

एटीएम, बँका झाल्या कॅशलेस : व्यापाऱ्यांकडून लूट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अलीकडे लग्नसराईचे दिवस असून, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वधू-वरांचे आणि वऱ्हाडी मंडळींसाठीच्या साहित्य आणि कपड्यांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे अकोला सराफा बाजारात आणि कापड बाजारात दररोज लक्षावधींची उलाढाल होत आहे. ही उलाढाल होत असताना मात्र अनेकांना कॅशलेसचा मोठा फटका सहन करावा लागतो आहे.मागील नोव्हेंबरमध्ये झालेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाबंदीनंतर देशभरातील एटीएममधील कॅश कमी करण्यात आली आहे. डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवून कॅशलेसला चालना दिली जात आहे. ई-बँकिंगच्या आर्थिक व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना पॉस मशीन घेतल्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. नोव्हेंबर महिन्यानंतर आता बाजारपेठेतील व्यवहार पर्यायाने पॉस मशीनने सुरू झालेत. शासनाकडून कॅशलेस व्यवहारासाठी सबसिडी मिळेल, ही अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही. उलटपक्षी विविध सरकारी आणि खासगी बँकांनी पॉस मशीनच्या प्रत्येक व्यवहारावर दोन टक्के सेवाकर घेणे सुरू केले आहे. हा सेवाकर कुणी भरावा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सबसिडी तर मिळाली नाही, उलटपक्षी प्रत्येक व्यवहारावर दोन टक्क्यांची लूट सुरू झाली आहे. शहरातील बहुतांश एटीएममध्ये कॅश नाही. त्यामुळे एटीएममधून रक्कम निघणे कठीण झाले आहे. दुसरीकडे बँकांमधून मोठी रक्कम कॅश स्वरूपात मिळणे कठीण झाले आहे. आपल्या बँक खात्यात रक्कम असूनही योग्य वेळी ती मिळत नसल्याने लोक त्रासले आहेत. त्यात लग्नसराईच्या निमित्ताने बाजारात आलेल्या लग्न वऱ्हाडींना पॉस मशीनशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे या लोकांच्या सोन्याच्या खरेदीवर दोन टक्के आणि कापडाच्या खरेदीवर दोन टक्के, असा चार टक्के सेवाकर द्यावा लागतो आहे. वास्तविक पाहता दोन टक्क्यांची कराची रक्कम ही व्यापाऱ्यांनी भरायची आहे; मात्र व्यापारी ग्राहकांना कॅश मागतो. कॅश नसल्याने पर्यायाने तो स्वाइप करण्याचे आणि दोन टक्के अतिरिक्त लागणार असल्याचे सांगतो. बाजारपेठेत वऱ्हाडी मंडळीसोबत आलेल्या वधू-वराच्या परिवाराला कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध राहत नसल्याने त्यांना सेवाकराचा हा फटका सहन करावा लागतो आहे.पॉस मशीनचा दोन टक्क्यांचा फटका व्यापारीच सहन करतो. कुणी ही रक्कम ग्राहकावर लादत असेल तर चुकीचे आहे. सुवर्णकाराची मजुरी आम्ही घेतो.- प्रकाश सराफ, व्यावसायिक अकोला.