शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

कापूस खरेदी मातीमोल भावात

By admin | Updated: November 9, 2014 01:12 IST

जिल्हय़ात कापसाचा पेरा नगण्य : वाशिम, रिसोड व मानोरा तालुक्यात कापसाचा पेरा अत्यल्प.

नंदकिशोर नारे / वाशिम

      अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांची वाट लागल्यानंतर शेतकर्‍यांच्या आशा तूर आणि कापूस पिकांवर आहेत. अनेक शेतकर्‍यांनी जेमतेम उत्पादन झालेल्या कापसाची वेचणीही उरकली; कापसाच्या शासकीय खरेदीला वेळ असल्याने व्यापार्‍याच्या दारात शेतकरी कापूस मातीमोल भावात विकत आहे. कापसाचे उत्पादन आधीच कमी असताना खासगी बाजारात कापसाला प्रती क्विंटल चार हजारांच्या आतच भाव मिळत असल्याने आर्थिक विंवचनेत सापडलेले शेतकरी कापसाच्या शासकीय खरेदीची आतुरतेने प्रतीक्षा क रीत आहेत. गतवर्षी अतवृष्टीने अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना यंदा अपुर्‍या पावसाने फटका बसला. मूग, उडीद ही पिके दिसलीच नाही, तर सोयाबीनचे उत्पादनही खर्व भरून काढू शकले नाही. मानोरा तालुक्यात यंदा दुबार, तिबार पेरणीच्या संकटाचा सामना करणार्‍या अनेक शेतकर्‍यांनी मूग, उडीद पिकांची वेळ निघून गेल्याने सोयाबीन, तूर आणि कपाशीचा आधार घेतला होता. त्यातच पावसाअभावी सोयाबीननंतर कपाशीच्या उत्पादनातही कमालीची घट आली. सोयाबीनचे एकरी क्विंटल उत्पादनही न झाल्यामुळे अनेक शेतकर्‍यांवर रडण्याचीच वेळ आली. कपाशीचे उत्पादनही घटले आणि त्यातच व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना कापसाचा चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अवर्षणामुळे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीनच्या विक्रीत पेरणीचा खर्चही निघाला नाही आणि आता कापसाचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणात नाही आणि बाजारपेठेत भावही नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कापसाच्या शासकीय खरेदीची प्रतीक्षा करीत आहेत. शासनाने कापसाच्या खरेदीची सुरुवात करून चांगले भाव द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. शासनाकडून कापसाचे हमीभाव प्रती क्विंटल ४ हजार ३६0 रुपये निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यातच शासकीय कापूस संकलन केंद्रावर कापसाची विक्री केल्यास शेतकर्‍यांना टप्प्याटप्प्याने त्याचा चुकारा मिळतो; परंतु शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठही मिळते. सद्यस्थितीत कापसाची शासकीय खरेदी सुरू झालेली नाही. त्यातच सोयाबीनच्या विक्रीतून पेरणीचा खर्चही वसूल न झाल्यामुळे शेतकर्‍यांना नाइलाजास्तव व्यापार्‍यांकडेच कापसाची विक्री करावी लागत आहे. मंगरूळपीर व मानोरा येथेच केवळ व्यापार्‍याकडून कापसाची खरेदी होत असून, मानोरा व मंगरूळपीर येथे ५५0 क्विंटलच्या जवळपास कापसाची खरेदी करण्यात आली आहे.