शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शहर स्वच्छतेसाठी नगरसेवकाचा पुढाकार

By admin | Updated: June 2, 2017 19:16 IST

जनतेसमोर आदर्श: मंगरुळपीर पालिकेचे गटनेते विरेंद्रसिंह ठाकूर यांचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर साफसफाईची कामे करण्याची मागणी शहरातील जनतेकडून जोर धरत असताना मंगरुळपीर येथील नगरसेवक तथा भाजप गटनेते विरेंद्रसिंह ठाकूर यांनी पालिका प्रशासनाच्या तयारीची प्रतिक्षा न करता आपल्या प्रभागात स्वत:च नाली सफाईचे काम करून जनतेसह पालिका कर्मचाऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. अलिकडच्या काळात सत्तेत असो वा विरोधी बाकावर, लोकप्रतिनिधी केवळ सल्ला देऊन मोकळे होणे आणि सभा बोलावून आपल्या कामांची बतावणी करण्यापलिकडे फारसे काही करण्यात उत्साही नसल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. विरोधात असताना सत्ताधारी गटाच्या धोरणाबाबत आरडाओरड करणे किंवा प्रशासनाच्या चुकांचा पाढा वाचणे, हे प्रकारही पाहायला मिळतात; परंतु अधिकार आणि पदाची दुसरी बाजू कर्तव्य आहे, याचा मात्र लोकप्रतिनिधींना पद्धतशीर विसर पडला असतो. याला काही अपवादही आहेत. त्यामध्ये मंगरुळपीर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा विद्यमान नगरसेवक विरेंद्रसिंह ठाकूर यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांत मंगरुळपीर शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांच्या मानंत प्रचंड निराशा आणि रोषाचे वातावरण आहे. त्यात पावसाळा तोंडावर असताना पालिका प्रशासनाने संभाव्य रोगराईला आवर घालण्यासाठी मान्सूनपूर्व कामे करणे गरजेचे आहे. त्यामध्ये ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिग साफ करणे, नाल्या उपसणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे आणि स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य लाभण्याचे आवाहन करणे, आदिंचा प्रामुख्याने समावेश होतो; परंतु मंगरुळपीर शहरात ३१ मेपर्यंतही त्याला प्रारंभ झाला नसल्याने पालिका प्रशासनासह त्यांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यतत्परतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशात विरेंद्रसिंह ठाकूर यांनी मान्सूनपूर्व कामे करण्याचा आग्रह पालिका प्रशासनाकडे धरला होता; परंतु त्याला प्रतिसाद लाभत नसल्याने त्यांनी चक्क स्वत:च हाती फावडे घेत नाल्या सफाईचे काम सुरू केले आणि शहराच्या जुन्या वस्तीमधील नाली पूर्ण साफ केली. विरेंद्रसिंह ठाकूर हे स्वत: प्रगतशील शेतकरीही आहेत शिवाय सामाजिकतेची ओढही त्यांना असल्याने त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढली आणि केवळ उभे राहून इतरांवर ताशेरे ओढण्यापेक्षा स्वत:च स्वच्छतेबाबत पुढाकार घेत तमाम जनतेसमोर आदर्श निर्माण केला.