शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा धोका अजून टळला नाही - डॉ. सुप्रिया राजोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:20 IST

CoronaVirus आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, असा सल्ला डॉ. सुप्रिया राजोळे यांनी दिला.

वाशिम : आॅक्टोबर महिन्यात कोरोनाचा आलेख खालावला असला तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नवरात्रौत्सव व आगामी सण, उत्सवाच्या काळात महिला, नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, असा सल्ला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया राजोळे यांनी दिला. शनिवारी त्यांच्याशी संवाद साधला असता, त्या बोलत होत्या.

आगामी, सण उत्सव आणि कोरोना याबाबत काय सांगाल?नवरात्रौत्सव हा मुख्यत्वे महिलांचा सण. यात पारंपारिक पद्धतीने नऊ दिवस उपवास व पूजा केली जाते. परंतू, सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात नऊ दिवस कडक उपवास करणे म्हणजे आपली रोगप्रतिकार क्षमता कमी करणे होय. त्यामुळे महिलांनी उपवासाच्या पद्धतीत बदल करून कडक उपवास शक्यतोवर टाळावे. कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे कुठेही गर्दी करू नये, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी?गर्भवती महिला, मधूमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब व जोखीम गटातील महिला, नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा अधिक धोका संभवतो. सण, उत्सवाच्या कालावधीत धार्मिक स्थळी किंवा मंदिर परिसरात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना महामारीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. नवरात्र व दसºयाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी न जाता सोशल मीडियाचा आधार घ्यावा. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.

सण, उत्सवादरम्यान कोणत्या उपक्रमांवर आरोग्य विभागाचा भर असतो? फिजिकल डिस्टन्सिंग व आवश्यक त्या अटींचे पालन करून कोरोना महामारीच्या काळात आरोग्यविषयक जनजागृती, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे. त्यानुसार दुर्गादेवी मंडळ व महिला मंडळांनीदेखील रक्तदान शिबिर, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यावर भर द्यावा.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याinterviewमुलाखत