कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच कैलासराव घुगे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जगदीश घुगे, रूस्तमराव घुगे, ग्रामपंचायत सदस्य संगीता दादाराव इंगळे, अनिता विलास कागणे, लक्ष्मी संजय इंगळे, ओंकार आंधळे,भाष्कर मुसळे, महादेवराव आंधळे, बाळूराव घुगे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम सरपंच कैलास घुगे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कोरोना लाटेत सुकांडा गावात शकडोच्या संख्येने बाधित निघाले असता आपला जीव धोक्यात घालून सुकांडा ग्रामस्थांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या राजुरा आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या आरोग्य सेविका जयश्री धांदू, आरोग्य सेवक अनिस कुरेशी, कंत्राटी आरोग्य सेविका रेखा भोबळे, आशा स्वयंसेविका शशिकला अवचार, सुनीता आंधळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य उल्हासराव घुगे यांनी, तर सूत्रसंचालन बाळूराव घुगे यांनी केले. आभारप्रदर्शन ओंकार आंधळे यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामस्थांची उपस्थिती होती..
सुकांडा ग्रा.पं.च्या वतीने कोरोनायोद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:48 IST