शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 11:09 IST

Corona Vaccine : मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणात अडथळा निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर शक्य तितक्या लवकर मात करण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यामुळे त्या प्रमाणात लस उपलब्ध करणे आवश्यक ठरणार आहे. यावेळी मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणात अडथळा निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस देण्यात आली. त्यानंतर पोलीस दलातील कर्मचारी आणि मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात सर्व प्रशासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील विविध आजार जडलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.  

४५ वर्षांपुढील दोन लाख नागरिकांचे करावे लागणार लसीकरण१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली          जाणार आहे. जिल्ह्यात या वयोगटातील नागरिकांची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे. या         सर्वांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाला युद्धस्तरावर तयारी करावी लागणार आहे.  तेवढा लसींचा साठादेखिल उपलब्ध ठेवावा लागणार आहे.

सध्या जेवढी मागणी तेवढ्या लसी उपलब्ध१४ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आरोग्यसेवक, फ्रन्टलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेले ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यासाठी ८८ हजार लस उपलब्ध झाली होती. त्यातील ४० हजारांच्या आसपास शिल्लक आहे. त्यामुळे सध्यातरी लसींचा तुटवडा नाही. 

कोरोना लसीकरण मोहीमेत आतापर्यंत तरी कुठलीही अडचण निर्माण झालेली नाही. कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे; मात्र भीतीपोटी अद्याप त्यास म्हणावा तसा प्रतिसाद संबंधितांकडून लाभत नसल्याचे दिसत आहे. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार असून आरोग्य विभाग त्यासाठी सज्ज आहे.- डाॅ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम