केरोना विषाणू संसर्गापासून सर्वांनी दक्ष राहावे, गावात सार्वजनिक ठिकाणी फिरू नये, गर्दी करू नये तसेच ४५ वर्षावरील नागरिकांनी लस घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जनजागृती केल्यानंतर कोरोना लसीकरणाबाबत शिबिर घेतले. १४० जणांना लस देण्यात आली. लस घेण्यासाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र, लसीचे केवळ १४० डोस उपलब्ध होते. हे डोस संपल्यानंतर उर्वरीत नागरिकांना लस घेता आली नाही. यावेळी ग्रा. पं. सरपंच संतोष ठाकरे, पं. स. सदस्य गोपाल भोयर, पो. पाटील गोविंद हेडा, तसेच विभागातील वैद्यकीय आधिकारी सागर जाधव, व आरोग्य सहायक मानके , डॉ ललित हेडा, आरोग्य सेवक श्रीकृष्ण भगत तसेच आशा सेविका निता राठोड, स्वाती राठोड, कविता चव्हाण, बेबी राठोड, दिव्या राठोड, ग्रा. पं कर्मचारी मनोज पवार, अशोक राठोड, ब्रम्हा जाधव आदींची उपस्थिती होती.
आसोला येथे कोरोना लसीकरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:40 IST