शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४० केंद्रांवर कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक प्रमाण हे ६० वर्षांवरील व्यक्ती तसेच दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींचे आहे. त्यामुळे या ...

कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक प्रमाण हे ६० वर्षांवरील व्यक्ती तसेच दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींचे आहे. त्यामुळे या गटातील व्यक्तींचा कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी त्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोना लसीचे दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने घेणे आवश्यक आहे. त्यानंतर १४ दिवसानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. ही लस घेतल्यानंतर कोणताही गंभीर दुष्परिणाम जाणवत नसून काही जणांमध्ये सौम्य ताप, अंगदुखी यासारखी लक्षणे दिसू लागतात. कोणतीही लस घेतल्यानंतर असे होणे साहजिक आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोना लसीकरण केंद्रामध्ये लस दिल्यानंतर अर्धा तास निगराणीखाली ठेवले जाते. याकाळात मानसिक किंवा शारीरिक अस्वस्थता अथवा वेदना झाल्यास कक्षातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना सांगावे.

कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येताना आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, जॉब कार्ड, पासपोर्ट, पेन्शनची कागदपत्रे, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक अथवा पोस्ट कार्यालयातून जारी केलेले पासबुक, केंद्र अथवा राज्य शासन किंवा पीएसयु, पब्लिक लिमिटेड कंपनीने अदा केलेले सर्विस ओळखपत्र सोबत घेऊन यावे. दीर्घ आजार असणाऱ्या व्यक्तींनी सदर आजाराविषयी सुरु असलेल्या उपचाराबाबतची कागदपत्रे सोबत आणावीत.

सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस नि:शुल्क उपलब्ध असून खाजगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरणासाठी प्रत्येक डोससाठी २५० रुपये रक्कम आकारली जात आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित असून पात्र व्यक्तींनी लसीकरण विषयक अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लस टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्र

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, कारंजा उपजिल्हा रुग्णालय, वाशिम सामान्य रुग्णालय येथे शासकीय लसीकरण केंद्र सुरु आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत लसीकरण सुरु आहे. तसेच सर्व ग्रामीण रुग्णालये, कारंजा उपजिल्हा रुग्णालय व सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रांवर रविवारी सुद्धा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येत आहे. वाशिम येथील बालाजी हॉस्पिटल प्रसूतिगृह आणि बाल रुग्णालय, माँ गंगा मेमोरियल बाहेती हॉस्पिटल, बिबेकर हॉस्पिटल, डॉ. व्होरा हॉस्पिटल, लाईफलाईन हॉस्पिटल, देवळे हॉस्पिटल, बालाजी बाल रुग्णालय येथे खाजगी लसीकरण केंद्र सुरु आहे.