शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:43 IST

वाशिम : गत दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट असून, या दरम्यान जिल्ह्यात जन्मदरात घट आल्याचे समोर आले आहे. सन २०१९-२० ...

वाशिम : गत दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट असून, या दरम्यान जिल्ह्यात जन्मदरात घट आल्याचे समोर आले आहे. सन २०१९-२० या वर्षात जिल्ह्यात ५३६२ बाळांचे जन्म झाले, तर २०२०-२१ या वर्षात ४,७७१ बाळांचे जन्म झाले असून, १ एप्रिल ते १३ मे, २०२१ या कालावधीत केवळ २० बाळांचे जन्म झाले.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पहिल्या लाटेत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या वाढली. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध असल्याने लग्न समारंभावरही मर्यादा आल्या. गर्भवती महिलांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याने अनेक जण पाळणा लांबवीत असल्याचेही दिसून येते. जिल्ह्यात सन २०१९-२० या वर्षात ५,३६२ बाळांचे जन्म झाले, तर २०२०-२१ या वर्षात ४,७७१ बाळांचे जन्म झाले असून, १ एप्रिल ते १३ मे, २०२१ या कालावधीत केवळ २० बाळांचे जन्म झाले. दुसरीकडे २०१९-२० या वर्षाच्या तुलनेत २०२०-२१ या वर्षात मृत्यूची संख्या वाढल्याचे दिसून येते. जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ९२ तर २०२०-२१ या वर्षात १६२ मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे.

०००००००

वर्षजन्म मृत्यू

२०१९ ५,३६२ ९२

२०२० ४,७७१ १६२

२०२१ २० ०८

००००००

लग्नांची संख्या घटली

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. पहिल्या लाटेत लग्नसमारंभाला ५० व्यक्तींची उपस्थिती अशी मर्यादा होती. दुसऱ्या लाटेत आता केवळ २५ व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसमारंभ उरकावा, असे आदेश आहेत. त्यामुळे लग्नांची संख्या घटल्याचे दिसून येते.

००००

जन्मदरात झाली घसरण..

सन २०१९-२०च्या तुलनेत सन २०२०-२१ या वर्षात जन्मदरात घट झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारीवरून दिसून येते. जवळपास ५९१ने जन्मदरात घसरण झाली आहे.

०००