शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटातही वाढला पीककर्ज वाटपाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:37 IST

जिल्ह्यात १३० लघू व केवळ ३ मध्यम प्रकल्प आहेत. मोठे प्रकल्प उभे करण्यास कुठलाच वाव नाही. यामुळे सिंचनाची प्रभावी ...

जिल्ह्यात १३० लघू व केवळ ३ मध्यम प्रकल्प आहेत. मोठे प्रकल्प उभे करण्यास कुठलाच वाव नाही. यामुळे सिंचनाची प्रभावी सुविधा नसल्याने फळबागा आणि भाजीपालावर्गीय पिक लागवडीचे प्रमाण तुलनेने खुपच कमी आहे. परिणामी, अधिकांश शेतकऱ्यांची दारोमदार रब्बी आणि खरीप हंगामावरच असते. त्यानुसार, कोरोनाचे संकट ऐरणीवर असतानाही शेतकऱ्यांनी कुठलीही तमा न बाळगता शेत मशागतीची कामे आटोपती घेतली असून बी-बियाणे व खताची जुळवाजुळव करून शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. चालूवर्षी ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होणार असून त्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा राहणार असल्याचे गृहीत धरून कृषी विभागाने त्यापद्धतीने नियोजन केले आहे.

शेतकऱ्यांना पैशांची चणचण भासू नये, यासाठी प्रशासनाने ९०० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडक निर्बंध लादण्यात आले; मात्र बॅंका सुरू ठेवण्यास दुपारी १ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली. बॅंकांनीही कोरोनाविषयक नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केल्याने कोरोनाच्या संकट काळातही पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होऊ शकले.

.....................

गतवर्षीचा वाटप ८१८ कोटींचा

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील थकबाकीदार १.६४ लाख शेतकरी कर्जमुक्त झाले होते. त्यामुळे त्या सर्वांना गतवर्षी नव्याने पीक कर्ज मिळणे शक्य झाले. परिणामी, १६५० कोटींच्या उद्दीष्टापैकी जुलै २०२० अखेर ८१८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले होते.

...............

पाच वर्षांत झालेले पीक कर्ज वाटप

२०१७-१८ : ३१२ कोटी

२०१८-१९ : ३९३ कोटी

२०१९-२० : ४०४ कोटी

२०२०-२१ : ८१८ कोटी

२०२१:२२ : ४७० कोटी