शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सहकार विभागाचा अजब कारभार!

By admin | Updated: November 18, 2016 02:25 IST

सावकारी कर्जमाफी प्रकरणी ज्याच्या विरोधात तक्रारी आहे त्यांनाच दिले होते चौकशीचे आदेश.

जगदीश राठोड मानोरा, दि. १७-ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्यांनाच चौकशी अधिकारी म्हणून नेमल्याने सहकार आयुक्तांकडे तक्रार झाली आणि आता चौकशी अधिकारी बदलून विभागीय सहनिबंधक कार्यालयातर्फे सावकारी कर्जमाफी प्रकरणाची चौकशी होणार आहे. सहकार विभागाचा हा अजब कारभार नुकताच समोर आला आहे.वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांचे कर्जमाफी प्रकरण जिल्हा समितीने मंजूर करून नंतर मानोरा येथील सहायक निबंधकासह नऊ लोकांवर जिल्हा विशेष लेखापरीक्षक काळे गुन्हे दाखल करावयास भाग पाडले. यावर मानोरा येथील महिला सावकाराच्यावतीने सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यावर त्यांनी विभागीय सहनिबंधक अमरावती यांना या प्रकरणी व्यक्तीश: चौकशी करून स्पष्ट अहवाल एका महिन्यात मागविला; पण तसे न करता विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी जिल्हा समितीमधील जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे चौकशीचे आदेश दिल्याने सहकार विभागाचा अजब कारभार समोर आला. कारण ज्यांच्या विरोधात तक्रारी आहे ते स्वत: काय अहवाल देणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.मानोरा तालुक्यातील सावकारी कर्जमाफी प्रकरण पोलिसाकडे गेले, त्यात सहकार विभागातील सहायक निबंधकासह नऊ लोकांवर गुन्हे दाखल झाले. यामुळे जिल्हाभर खळबळ माजली होती. याप्रकरणी मानोरा येथील एका महिला सावकाराच्या पतीने जिल्हास्तरीय समितीमधील जिल्हा विशेष लेखा परीक्षकाच्या कामकाजाबाबत पात्र सावकार व शेतकर्‍यांच्या नावासह सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्याची दखल सहकार आयुक्तांनी घेत या प्रकरणी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना व्यक्तीश: चौकशी करून स्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यामुळे शेतकरी कर्जमाफी प्रकरणातून झालेला बोगस व्यवहार व आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; पण या गंभीर शेतकरी कर्जमाफीप्रकरणी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी १८ ऑक्टोबरला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम यांना पत्र देऊन व्यक्तीश: चौकशी करून आपला स्वयंस्पष्ट अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तक्रारकर्त्यांंंंची जिल्हा समितीच्या कामकाजाविषयी तक्रार असताना जिल्हा समितीमधील अधिकार्‍यास चौकशीचे आदेश देणे म्हणजे तक्रारकर्त्यास न्याय देणे ठरेल काय, ही बाब समोर आली. सहकार विभागाच्या या अफलातून प्रकाराने सावकारी कर्जमाफी प्रकरणातील पात्र शेतकर्‍यांना न्याय मिळण्याची आशा मावळली आहे. तक्रारकर्ता राजेश पुरी यांनी सावकारी कर्जमाफी अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीमधील जिल्हा विशेष लेखा परीक्षण व समितीच्या कामकाजाविषयी तसेच उदाहरण दाखल पात्र सावकार व शेतकर्‍यांच्या नावासह मुद्दे नमूद केले आहे. याबाबत सहकार आयुक्त यांनी विभागीय सहनिबंधक यास चौकशीचे आदेश दिले होते हे विशेष.