शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

न उगविणाऱ्या बियाण्यांवरून ‘वादंग’!

By admin | Updated: June 29, 2017 01:24 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा : समाजकल्याणच्या योजना राबविण्याला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मानोरा तालुक्यात महाबीजचे बियाणे न उगविल्यानंतरही, कृषी विभागाच्या चमूने पाहणी केली नसल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत सभागृह दणाणून सोडले. याप्रकरणी चौकशी करून दोन दिवसात नुकसानभरपाई अहवाल सादर करण्याचे निर्देश पीठासीन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सदस्य शांत झाले.जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात २८ जून रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दुपारी १ वाजता सुरू झाली. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख तर मंचावर उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर पाटील गोळे, पानुताई जाधव व यमुना जाधव आदींची उपस्थिती होती. सभेला सुरुवात होताच जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी महाबीज बियाण्याची रिकामी बॅग परिधान करून सभागृहाचे लक्ष वेधून घेत मानोरा तालुक्यातील न उगविलेल्या महाबीजच्या बियाण्याचा मुद्दा उपस्थित केला. मानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी महाबीजचे बियाणे पेरले; मात्र बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. असे असतानाही कृषी विभागाच्या चमूने घटनास्थळाची पाहणी केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी रोकडे यांनी लावून धरली. या मुद्याला अन्य जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दुजोरा दिला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, या मागणीने सभागृह दणाणून सोडले. सदस्यांची मागणी लक्षात घेऊन पीठासीन अधिकारी देशमुख यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश कृषी विकास अधिकाऱ्यांना दिले. दोन दिवसात चौकशी करून नुकसानभरपाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देशमुख यांनी केल्या.जिल्हा परिषद सदस्य विश्वास गोदमले यांनी कंझरा रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नावर ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून गोदमले यांनी सभागृह सोडणे पसंत केले. सन २०१६-१७ या वर्षात समाजकल्याण विभागाच्या काही योजना राबविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या योजना सन २०१७-१८ या वर्षात राबविण्यासाठी सभागृहाने मंजुरी देण्याचा मुद्दा समाजकल्याण विभागाने सभागृहासमोर ठेवला. या मुद्याला सभागृहाने सर्वानुमते संमती दिली. जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर यांनी शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न उपस्थित केले. ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्रणा उभारण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेने निधीची तरतूद करावी, अशी मागणी अमदाबादकर यांनी केली. सभेत जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे, विकास गवळी, सचिन पाटील रोकडे, चक्रधर गोटे, देवेंद्र ताथोड यांच्यासह सदस्यांनी सहभाग नोंदविला. दुपारी १ वाजतापासून सुरू झालेली ही सभा रात्री ७ वाजेपर्यंत चालली.जि.प.तील अस्वच्छतेवर अध्यक्षांचे ‘ताशेरे’स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली जाते. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आवारात, स्वच्छता गृह व पायऱ्यांजवळ अस्वच्छता असल्याने ही बाब विसंगत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मांडला. जिल्हा परिषदेत नियमितपणे साफसफाई झाली पाहिजे, अशा सूचना देशमुख यांनी बांधकाम विभाग व सामान्य प्रशासना विभागाला केल्या. यापुढे ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही अध्यक्षांनी दिला.