शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसामुळे गरिबांच्या घरांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

००००००००००००००००० कोठेकोठे घडल्या घटना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे ८ सप्टेंबरला बंडू ऊर्फ महादेव पारधी यांच्यासह इतर काही कामगारांची घरे ...

०००००००००००००००००

कोठेकोठे घडल्या घटना

मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे ८ सप्टेंबरला बंडू ऊर्फ महादेव पारधी यांच्यासह इतर काही कामगारांची घरे कोसळली. कारंजा तालुक्यातील धनज बु. येथील सुनील डफडे यांचे घर सततच्या पावसामुळे १० सप्टेंबर रोजी कोसळले. उंबर्डा बाजार येथील मीना हुतके, प्रमोद धोपे, गणेश ठाकरे, उमेश ठाकरे, मयूर बुरघाटे, मुमताजबी शे.इसाक यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या घरांच्या मातीच्या भिंती ८ सप्टेंबर रोजी जमीनदोस्त झाल्या, तर काजळेश्वर येथील प्रल्हाद मनिराम पवार आणि गणेश विष्णू राठोड यांच्या घराच्या भिंती पावसामुळे कोसळल्या.

००००००००००००००

घरकुलाच्या लाभाअभावी जीव धोक्यात

शासनाकडून आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि कुडामातीच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास, इंदिरा आवास, रमाई आवास योजना अस्तित्वात आल्या. त्याचा लाभ मिळावा म्हणून अनेकांनी प्रशासनाकडे अर्जही केले. त्यातील काहींना घरकुल मंजूर झाले असले तरी अनुदान रखडले आहे. तर काहींना घरकुलच मंजूर झाले नसल्याने त्यांचे घराचे स्वप्न अर्धवटच असून, सततच्या पावसामुळे मातीची घरे कोसळून त्यांच्या जिवाला धोका आहे.

०००००००००००००००००

कोट : शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जातात. घर नसलेल्यांना अर्ज करण्यासही सांगितले जाते; परंतु अर्ज केल्यानंतर विविध अटी घालून वंचित ठेवले जाते. कधी ८ अ नसल्याचे, तर कधी कर भरला नसल्याचे सांगून प्रशासनाकडून योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे मातीच्या घरात जीव धोक्यात घालून राहावे लागते.

.- प्रल्हाद पवार, आपदग्रस्त काजळेश्वर

००००००००००००००००००००००००

कोट : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या भिंतीत पाणी मुरल्याने भिंत कोसळली. आम्ही झोपेत असताना ही घटना घडली. सुदैवाने आमचे प्राण वाचले. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला, तर आम्ही सुरक्षितपणे जीवन जगू शकतो. जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी.

- सुनील डफडे,आपदग्रस्त, धनज बु.

०००००००००००००००००००००००००