शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पाऊस; शेतक-यांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:48 IST

०००००००००००० तीन गटविकास अधिकारी केव्हा मिळणार? वाशिम : मालेगाव पंचायत समितीला नियमित गटविकास अधिकारी मिळाले असून, उर्वरीत वाशिम, रिसोड ...

००००००००००००

तीन गटविकास अधिकारी केव्हा मिळणार?

वाशिम : मालेगाव पंचायत समितीला नियमित गटविकास अधिकारी मिळाले असून, उर्वरीत वाशिम, रिसोड व मंगरूळपीर पंचायत समितीला नियमित गटविकास अधिकारी केव्हा मिळणार? याकडे पदाधिकारी, सदस्यांचे लक्ष लागून आहे.

००००००००००००

प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त

वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर, किन्हीराजा, मेडशी आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रिक्त पदे भरण्यात यावे, अशी मागणी जि. प. सदस्य शाम बढे यांनी २१ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेकडे केली.

००००

तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालय मिळेना!

वाशिम : वाशिम तालुक्यातील ५२ पैकी जवळपास ३८ ठिकाणी अद्याप तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालय मिळाले नाही.

वाशिम तालुक्यात तलाठ्यांची एकूण ५२ पदे मंजूर असून जवळपास ४४ ते ४५ तलाठी कार्यरत आहेत. वाशिम शहरातील सांजे तसेच वाई, राजगाव, अनसिंग आदी १० ते १२ ठिकाणचा अपवाद वगळता उर्वरित तलाठ्यांना अद्याप स्वतंत्र कार्यालय नाही.

००००

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरत

वाशिम : येथील हिंगोली नाका रेल्वेगेटनजीक निर्माणाधीन उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या दोन्ही रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून गटारे झाली आहेत. त्यामुळे वाहने चालविताना कसरत होत आहे.

०००००००

पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान

वाशिम : काटा परिसरात मंगळवार व बुधवारी झालेल्या पावसामुळे फळपिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी हताश झाल्याचे दिसून येते.

०००००

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी

वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत आरोग्य केंद्र, उपकेंद्रांत रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.