शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ना-हरकत’ नसतानाही बांधकाम!

By admin | Updated: January 5, 2017 02:20 IST

शासकीय कार्यालय इमारत बांधकाम प्रकरणी महसूल विभागाची बांधकामावर हरकत.

संतोष वानखडेवाशिम, दि. ४-आवश्यक त्या कागदपत्रांचे सोपस्कार आणि 'ना हरकत' प्रमाणपत्राची कार्यवाही पूर्ण झालेली नसतानाच, बांधकाम विभागाने शहरातील काही शासकीय कार्यालय इमारत व शासकीय निवासस्थानांचे बांधकाम पूर्णत्वाकडे नेल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.विविध शासकीय कार्यालयांच्या इमारती व शासकीय अधिकार्‍यांच्या शासकीय निवासस्थानांसाठी महसूल विभागातर्फे जमीन वाटप केले जाते. जमीन वाटप करण्यापूर्वी संबंधित विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाला त्या-त्या तहसील कार्यालयात जमीन मिळणेबाबतचा अर्ज सादर करावा लागतो. सद्यस्थितीत वाशिम शहरात नियोजन भवन, विस्तारित विश्रामगृह, अपर पोलीस अधीक्षकांचे शासकीय निवासस्थान यासह अन्य शासकीय कार्यालय इमारतींचे बांधकाम सुरू आहे. पूर्ण प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर जमीन हस्तां तरण व ताबा मिळणे ही कार्यवाही केली जाते. शासकीय कार्यालय इमारत व अधिकार्‍यांच्या शासकीय निवासस्थानांचे संपूर्ण बांधकाम करून देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन, जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरील विस्तारित विश्रामगृह व अपर पोलीस अधीक्षकांचे शासकीय निवासस्थान या तीन इमारतींचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू आहे. जमीन हस्तांतरण व ताबा, ना-हरकत प्रमाणपत्र यासंदर्भात बांधकाम विभाग व तहसील यांच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती आहे. अद्याप बांधकाम विभागाने प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केले नसल्याने, अपर पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानांचे बांधकाम थांबविण्यासंदर्भात बांधकाम विभागाला पत्रही देण्यात आल्याची माहिती आहे. शासकीय निवासस्थानसंदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने बांधकाम यथाशीघ्र थांबविण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्याचा इशाराही दिला होता. तथापि, या पत्राला केराची टोपली दाखवित बांधकाम सुरू असल्याचे दिसून येते.'जागा वाटप'संदर्भात अनिश्‍चितताकोणत्याही शासकीय कार्यालय किंवा शासकीय निवासस्थानांना शासकीय जमीन देताना, तहसील कार्यालय व महसूल विभागाकडे आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करावे लागतात. प्र त्येक विभागाचे ह्यना-हरकतह्ण प्रमाणपत्र, नगर रचना विभाग व नगर परिषदेची आवश्यक ती परवानगी आदी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तहसील कार्यालयात सविस्तर प्रस्ताव सादर केला जातो. येथे या प्रस्तावाची छाननी होऊन महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला जातो. प्रस् ताव पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकारी जमीन हस्तांतरण व प्रत्यक्ष ताबा याबाबतची मंजुरी देतात. बांधकाम विभागाने अद्याप काही विभागाचे ह्यना-हरकतह्ण प्रमाणपत्र सादर केले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.कोणत्याही शासकीय कार्यालय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यापूर्वी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. अद्याप माझ्याकडे याबाबतची फाइल आली नाही. या प्रकरणी योग्य ती माहिती घेऊन चौकशी केली जाईल.- शैलेश हिंगेप्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिमनियोजन भवन, विश्रामगृह व अपर पोलीस अधीक्षक निवासस्थान या तीन विभागाचे जागा वाटप झालेले आहे. या प्रक्रियेतील 'कागदपत्रांची फेर प्रक्रिया व ना-हरकत प्रमाणपत्रा'च्या काही बाबी अपूर्ण राहिलेल्या आहेत. त्या लवकरच पूर्ण केल्या जातील.- के. आर. गाडेकरकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम