शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बांधकाम साहित्य महागले; घरकुलाचे अनुदान ‘जैसे थे’च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:43 IST

वाशिम : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे एकापाठोपाठ एक असे हादरे बसत आहेत. इंधन, खाद्यतेल, डाळी यापाठोपाठ आता सिमेंट, विटा, लोखंडाचे ...

वाशिम : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे एकापाठोपाठ एक असे हादरे बसत आहेत. इंधन, खाद्यतेल, डाळी यापाठोपाठ आता सिमेंट, विटा, लोखंडाचे दरही वाढले आहेत. एका वर्षात सिमेंट, विटा, रेती, लोखंड, आदींच्या भावात दीडपटीने वाढ झाली; तर घरकुलाचे अनुदान मात्र ‘जैसे थे’च असल्याने बांधकाम पूर्ण कसे करावे? असा प्रश्न सहा हजार लाभार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.

देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. २४ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने जून महिन्यांपर्यंत बांधकामेही ठप्प होती. त्यानंतर अनलॉकचे टप्पे सुरू झाले आणि बांधकाम क्षेत्राला परवानगी मिळाली. लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जून यादरम्यान उत्पादक कंपन्या प्रभावित झाल्याने त्यानंतर बांधकाम साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. स्टील, सिमेंट, विटाच्या दरांत वाढ झाल्याने साहजिकच घरांचे बांधकामही महागले. दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. संचारबंदी व कडक निर्बंध लागू आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बांधकाम साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे कडक निर्बंध असल्याने दुकाने बंद असतानाही हे दर वाढत आहेत. उत्पादक कंपन्यांकडून होत असलेली ही दरवाढ घरकुल लाभार्थ्यांना जबर फटका देणारी ठरत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सिमेंटच्या एका गोणीचे भाव ३०० ते ३३० रुपयांदरम्यान होते. आता हेच दर ३९० ते ४१० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गतवर्षी ऑगस्टमध्ये लोखंडाचे दर प्रतिकिलो ३८ ते ४६ रुपयांदरम्यान होते. आता हेच दर ५६ ते ५८ रुपयांपर्यंत झेपावले आहेत. कच्च्या मालाच्या दरांत वाढ झाल्याने सिमेंट व लोखंडाचे भाव वाढल्याचे सांंगण्यात येत आहे. मजुरी, विटा, रेती, गिट्टीच्या भावांतही वाढ झाली आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात घरकुल बांधकामासाठी गत ६ वर्षांपासून १.२० लाख रुपयेच अनुदान आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण कसे करावे? हा आर्थिक पेच लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. सन २०२०-२१ मध्ये दोन हजार घरकुले आणि त्यापूर्वीची अपूर्ण असलेली जवळपास चार हजार, अशा एकूण सहा हजार घरकुल लाभार्थ्यांना या दरवाढीचा फटका बसला आहे.

०००००००००००००००००

साहित्य आधीचे दर आताचे दर

वाळू- ७०००- ९८००

गिट्टी- २३००- २८००

विटा- ४०००- ६०००

लोखंड - ३८४७- ५७००

सिमेंट- ३२०- ४००

००००

एकूण घरकुल बांधकामे - ६०००

नवीन घरकुले - २०००

अपूर्ण घरकुले - ४०००

०००००

घरकुलासाठी (ग्रामीण) मिळणारे अनुदान -१.२० लाख

००००००

कोट

कोरोनामुळे गतवर्षी काही महिने उत्पादक कंपन्या बंद होत्या. वाहतूकही प्रभावित होती. याचा परिणाम म्हणून दरवाढ झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. आता परत बांधकाम साहित्याच्या दरांत वाढ झाली आहे. तीन महिन्यांत सिमेंटच्या गोणीमागे ५० ते ६० रुपयांची वाढ झाली.

- वीरेंद्र बागरेचा,

बांधकाम साहित्य विक्रेता

००००

एकीकडे बांधकाम साहित्याच्या किमतीत दर दोन, तीन महिन्यांनी वाढ होत आहे; तर दुसरीकडे ग्रामीण भागातील घरकुल योजनांचे अनुदान मात्र जैसे थे राहत आहे. महागाईमुळे १.२० लाखांत घरकुल बांधकाम पूर्ण कसे करावे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

- गौतम वानखडे

घरकुल लाभार्थी

०००००