कारंजा लाड : तालुक्यातील ग्राम पलाना येथे जगन्नाथ ढगे यांनी सरकारी योजनेतून घरकुलाचा लाभ घेऊन चक्क सरकारी जागेत बांधकाम केले. यामुळे गावातील लोकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहेत. संबंधिताविरुद्ध त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी पलाना येथील योगेश मुसळे यांनी जि. प.च्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे १७ सप्टेंबरला सादर केलेल्या निवेदनात केली.
निवेदनात नमूद आहे की, जगन्नाथ ढगे यांना ग्रामपंचायत कार्यालय, पलानाअंतर्गत मिळालेल्या घरकुल बांधकामास सरकारी रस्त्यावरील जागेत पक्के बांधकामाची बेकायदेशीर मुभा देण्यात आली. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही विशेष काही झालेले नाही. तक्रारकर्ते मुसळे यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना ५ ऑगस्टला पत्र दिले. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सात दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले; परंतु अद्यापपर्यंत कुठलाच अहवाल सादर करण्यात आला नाही.
तथापि, प्रशासनातील अधिकारी चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीस पाठीशी घालत असल्याचे योगेश मुसळे यांचे म्हणणे आहे.
................
सरकारी जागेत घरकुल बांधकाम प्रकरणाची चैाकशी केली जाईल. संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास महाराष्ट्र अधिनियम १९५८ मधील कलम ५३, पोटकलम २ व ३ नुसार ग्रामपंचायतीमार्फत अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल.
राजेश हवा, सचिव, ग्राम पंचायत पलाना