शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सतत घरात राहिल्याने वाढले मुलांचे वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचे नवे शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. रुग्ण हळूहळू कमी होत गेल्यानंतर चालूवर्षात आधी नववी ...

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचे नवे शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. रुग्ण हळूहळू कमी होत गेल्यानंतर चालूवर्षात आधी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असून मार्च महिन्यात तर बाधितांचा आकडा चांगलाच फुगला आहे. परिणामी, शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेऊन सुरू केलेल्या शाळा पुन्हा बंद केल्या. यासह खबरदारीचा उपाय म्हणून मैदानी खेळांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे मुले अधिकांशवेळ घरातच राहत असून मोबाईल, संगणक अन् टी.व्ही. हेच जणू त्यांचे विश्व बनले आहे. मोकळे खेळायला भेट नसल्यानेच त्यांच्या वजनात वाढ होत असल्याचे बालरोगतज्ज्ञांमधून बोलले जात आहे.

................................

मुलांनी हे करावे

मुलांनी वजन न वाढण्यासाठी काय करावे आणि काय करू नये

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे घरातच राहावे लागणार. अशा स्थितीत मुलांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यायला हवे. रात्री लवकर झोपण्यासोबतच सकाळी लवकर झोपेतून उठावे. शारिरीक हालचाल करण्यासाठी घरासमोरील मोकळ्या जागेत अथवा रस्त्यांवर किमान धावण्याचा सराव करावा, मैदानी खेळ खेळावे. विशेषत: जेवणाची वेळ ठरवूनच ठेवावी. त्याच निर्धारित वेळेला जेवण करावे. मोबाईल अन् टी.व्ही. सतत न पाहता त्याच्या वेळाही निश्चित कराव्या. असे केल्यास वजन नियंत्रणात राहणे शक्य आहे.

..............

मुलांनी हे करू नये

मोबाईल, संगणक आणि टी.व्ही.चा अनावश्यक वापर टाळावा. यामुळे अधिकवेळ बसण्याची गरज भासणार नाही. जंकफूडचे सेवन पूर्णत: टाळायला हवे. जास्तीत जास्त ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. अनेकवेळ एकाच ठिकाणी बसून न राहता घरातल्या घरात अथवा मैदानावर खेळणे वाढवावे. शारिरीक हालचाल सतत करित राहावे.

.................

लॉकडाऊनमुळे मुलांच्या सर्वच वेळापत्रकात अनियमितता आल्यानेच त्यांच्या वजनात वाढ होत आहे. याशिवाय पाणीपुरी, पावभाजी, मॅगी यासारख्या जंगफूडचा प्रमाणापेक्षा अधिक वापर होत आहे. मुले दिवसभर घरीच राहत असल्याने त्यांची झोपण्याची, जेवण करण्याची वेळ निश्चित राहिलेली नाही. यामुळेही मुलांच्या वजनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. राम बाजड

.................

सकाळी लवकर उठणे, शाळेत जाणे आणि दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर जेवण, सायंकाळी मैदानावर जाऊन खेळणे, थकवा आल्यानंतर रात्री आपसूकच लवकर झोपणे आणि पुन्हा सकाळी लवकर उठणे हा मुलांचा दिनक्रम कोरोनामुळे पूर्णत: विस्कळित झालेला आहे. आता मुले घरातच राहत असून सर्वच वेळा अनिश्चित झाल्याने त्यांच्या वजनात वाढ होत आहे.

- डॉ. हरीश बाहेती

...............

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जिवनशैलीत अमुलाग्र बदल झालेला आहे. विशेषत: लहान मुलांच्या शाळा बंद असल्याने त्यांचा दिनक्रमही बदललेला आहे. आॅनलाईन क्लासेससाठी तासन्तास मोबाईल हातात राहत आहे. त्यानंतर संगणक किंवा टी.व्ही.समोर मुले बसत आहेत. या सर्व बाबींचा परिणाम त्यांच्या वजन वाढीवर झालेला आहे.

- डॉ. गजानन मस्के