शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पिकांनी टाकल्या माना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:18 IST

वाशिम: जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाची पीक परिस्थिती अंत्यत दयनीय झाली असून, पाण्याअभावी पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. म्हणायला, रविवारी (२.१७ मि.मी.) आणि सोमवारी काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु तो पुरेसा नसल्याने चांगल्या जमिनीवरील पिकांच्या सरासरी उत्पादनात ३0 टक्के, तर हलक्या जमिनींवरील पिकांच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून वर्तविले जात आहेत.

ठळक मुद्देसरासरी उत्पादन घटण्याची शक्यता शासनाचा सर्वेक्षणाला ‘खो’!सोयाबीनची फुलगळ; शेंगाही अपरिपक्व!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाची पीक परिस्थिती अंत्यत दयनीय झाली असून, पाण्याअभावी पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. म्हणायला, रविवारी (२.१७ मि.मी.) आणि सोमवारी काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु तो पुरेसा नसल्याने चांगल्या जमिनीवरील पिकांच्या सरासरी उत्पादनात ३0 टक्के, तर हलक्या जमिनींवरील पिकांच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून वर्तविले जात आहेत.जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून, त्यापैकी यावर्षी ४.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपातील विविध पिकांची पेरणी करण्यात आली. असे असले तरी जून महिन्याच्या प्रारंभी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने त्यानंतर मात्र सतत हुलकावणी दिली. अधूनमधून पाऊस झालाही; परंतु तो सार्वत्रिक स्वरूपातील नाही. त्यामुळे १ जून २0१७ ते १३ ऑगस्ट २0१७ या कालावधीत वार्षिक सरासरीच्या ४१.८१ टक्के पर्जन्यमान होऊनही पिके धोक्यात सापडण्यासोबतच जिल्ह्यातील १२२ पैकी तब्बल ७५ सिंचन प्रकल्प अद्याप कोरडच आहेत. यामुळे नापिकीच्या संकटासह आगामी काळात पाणीटंचाईदेखील भीषण रूप धारण करण्याची शक्यता उद्भवली आहे. 

सोयाबीनची फुलगळ; शेंगाही अपरिपक्व!सध्या शेतांमधील सोयाबीन पिकाला फूल तसेच शेंगा लागल्या आहेत. अशास्थितीत पुरेशा पाण्याची नितांत गरज भासत आहे. मात्र, पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे फुलांची गळती होत असून, सोयाबीनच्या शेंगा अपरिपक्त असताना त्याही पाण्याअभावी गळून पडत आहेत. त्याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर होणार असून, आधीच अडचणीत असलेला शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकरी त्यांचाकडे उपलब्ध असलेल्या थोड्याफार पाण्याचा स्प्रिंकलेरच्या सहाय्याने वापर करून शेत भिजवत आहेत. मात्र, हे पाणीदेखील अधिक काळ पुरणार नसल्याचे चित्र आहे.