--
सुपखेलानजीक नाल्यावरील पुलाची दुरवस्था
देपूळ : सुपखेलानजीकच्या नाल्यास पावसाळ्यात आलेल्या पुराने या नाल्यावरील पूल खरडून गेला. यामुळे खड्डे पडले असून, येथे अपघाताची भीती आहे. बांधकाम विभागाने या पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे
^^^
रस्त्यावर जीवघेणा खड्डा, अपघाताची भीती
वाशिम : मानोरा ते कारंजा या मुख्य रस्त्यावरील धामणी गावाजवळ मोठा खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेने हा खड्डा बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.
----
वन्यप्राण्यांकडून भाजीपाला पिकांचे नुकसान
पोहरादेवी : परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान होत आहे. गतवर्षी अगोदरच पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. वन्यप्राणीदेखील भाजीपालावर्गीय पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
-----
मंगरुळपीर तालुक्यात एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित
वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दरदिवशी आढळत असून, मंगरुळपीर तालुक्यात बुधवार १० फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी पाच जणांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले. त्यात शहरातील मंगलधाम येथील १, इतर ठिकाणचे २, शहापूर येथील २ व्यक्ती आहेत.
--------
आरोग्य विभागाकडून ५७५ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
वाशिम : ग्रामीण भागांत दरदिवशी कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागांत ग्रामस्थांची तपासणी केली जात आहे. त्यात आठवडाभरात ५७५ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.